adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनुदेवी येथे महाआरती व वृक्षारोपण

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनुदेवी येथे महाआरती व वृक्षारोपण यावल तालुका प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड) हिंदूजननायक, मराठी हृद...

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनुदेवी येथे महाआरती व वृक्षारोपण




यावल तालुका प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

हिंदूजननायक, मराठी हृदयसम्राट तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रावेर लोकसभा यांच्या वतीने खान्देशची कुलस्वामिनी श्री क्षेत्र मनुदेवी येथे महाआरती व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार यांनी आई मनुदेवीच्या चरणी राजसाहेब ठाकरे यांना उदंड निरोगी व दीर्घायुष्य लाभावे तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकाधिक महाराष्ट्र सैनिक लोकप्रतिनिधी म्हणून निवडून यावेत, अशी प्रार्थना केली.

कार्यक्रमादरम्यान महाआरती करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले. 

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हा सचिव विष्णू कोळी, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना सचिव अमोल पाटील, मनविसे चोपडा संघटक चेतन पवार, मनविसे यावल तालुका उपाध्यक्ष उदय पाटील, मनविसे चोपडा तालुका उपाध्यक्ष नितीन कोळी तसेच आकाश कोळी, आनंद भिल्ल, रोहित कोळी, योगेश कोळी, अक्षय कोळी, दुर्गेश कोळी, निलेश कोळी, मयूर कोळी यांच्यासह महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमामुळे राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक, धार्मिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवून समाजापुढे एक आदर्श निर्माण करण्यात आला.

No comments