मुक्ताईनगर पोलिसांचे हरवलेल्या व्यक्तींचा शोध सुरू नागरिकांना सहकार्याचे आवाहन सतीश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मुक्ता...
मुक्ताईनगर पोलिसांचे हरवलेल्या व्यक्तींचा शोध सुरू नागरिकांना सहकार्याचे आवाहन
सतीश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर:- पोलीस स्टेशन हद्दीत विविध कालावधीत हरवलेल्या तीन व्यक्तींचा शोध पोलिसांकडून सुरू असून, संबंधित व्यक्तींबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिनांक 23 जुलै 2026 रोजी तक्रारदार नितीन राजेंद्र पाटील रा. उचंदा, ता. मुक्ताईनगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे वडील राजेंद्र पंडित पाटील (वय 60) हे 22 जुलै 2024 रोजी दुपारी 12.30 ते 1 वाजेदरम्यान घरातून कोणालाही न सांगता निघून गेले. त्यांचे वर्णन सावळा रंग, उंची सुमारे 5 फूट 5 इंच, अंगात निळ्या रंगाचा फुल शर्ट, फुल पॅन्ट व पायात चप्पल असे असून ते मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे मिसिंग तक्रार क्र. 40/2024 दाखल करण्यात आली आहे. तसेच दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी तक्रारदार सुवर्णा मधुकर इंगळे, रा. उचंदा यांनी त्यांचा मुलगा पंकज मधुकर इंगळे (वय 23) हरवल्याची तक्रार दिली होती. पंकज हा 24 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 11.30 ते 12.30 वाजेदरम्यान घरातून निघून गेला होता. त्याचे वर्णन सावळा रंग, मोठे डोळे, सरळ नाक, पाठीवर मोठा मस, उजव्या पायाने लंगडत चालतो, उंची 5 फूट, अंगात पांढरा फुल टी-शर्ट व फुल पॅन्ट असे आहे. याप्रकरणी मिसिंग तक्रार क्र. 65/2023 दाखल असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
याशिवाय दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी तक्रारदार राधाबाई दत्तू सोनटक्के, रा. उचंदा यांनी त्यांचा मुलगा भगवान दत्तू सोनटक्के (वय 45) हरवल्याची तक्रार दिली आहे. भगवान सोनटक्के हे 13 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घरातून कोणालाही न सांगता निघून गेले. त्यांचे वर्णन गोरा रंग, लांब दाढी, पांढरी मिशी, डोक्यावरील केस पूर्ण पांढरे, उंची 5 फूट 3 इंच, अंगात आकाशी रंगाचा टी-शर्ट व फुल पॅन्ट असे असून ते मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे सांगण्यात आले आहे. तीन्ही व्यक्तींचा शोध घेण्यासाठी मुक्ताईनगर पोलिसांकडून विविध ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात येत आहे. संबंधित व्यक्तींबाबत कोणाला माहिती मिळाल्यास मुक्ताईनगर पोलीस स्टेशनशी किंवा पोलीस दूरध्वनी क्रमांक 912583234333 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे

No comments