adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा ते पंढरपूर दिंडीतील वारकऱ्यांसाठी एक लाखाचा विमा काढणार.. वारकऱ्यांनी सहभाग घ्यावा.. दिंडीसेवक जगन्नाथ बाविस्कर यांचे आवाहन.

चोपडा ते पंढरपूर दिंडीतील वारकऱ्यांसाठी एक लाखाचा विमा काढणार.. वारकऱ्यांनी सहभाग घ्यावा.. दिंडीसेवक जगन्नाथ बाविस्कर यांचे आवाहन. चोपडा प्र...

चोपडा ते पंढरपूर दिंडीतील वारकऱ्यांसाठी एक लाखाचा विमा काढणार..

वारकऱ्यांनी सहभाग घ्यावा.. दिंडीसेवक जगन्नाथ बाविस्कर यांचे आवाहन.



चोपडा प्रतिनिधी

(संपादक : हेमकांत गायकवाड)

शहरातील श्री विठ्ठल मंदिर येथून २७ जून २०२६ रोजी स. ८ वा. श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडीचे प्रथम वर्ष प्रस्थान होत असून या दिंडीत सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांचा नामांकित विमा कंपनीकडून एक वर्षासाठी रू.१०००००/- एक लाखाचा जनता अपघात विमा काढण्यात येणार आहे, अशी माहिती दिंडी सेवक/ ग्रामगीता प्रचारक जगन्नाथ बाविस्कर (गोरगावलेकर) यांनी ह्या पत्रकान्वये दिली आहे.

        प्रथमच दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने चोपडा ते पंढरपूर संकीर्तन आषाढी वारी पायी पालखीरथ दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. एकूण २२ मुक्काम करून २३ व्या दिवशी दिंडी पंढरपुरात पोहचणार आहे. दररोज वारकऱ्यांना २०/२२ कि.मी.अंतर चालावे लागणार आहे. त्या दरम्यान त्या त्या गावांतील दानशूर व्यक्तींकडे चांगल्या पद्धतीने सेवासुविधेसाठी ठेपे बांधण्यात आलेले आहेत. वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी प्राथमिक उपचार म्हणून सर्वप्रकारच्या गोळ्या औषधी सोबत घेण्यात येणार आहेत. तरीही वेळोवेळी आवश्यक त्याठिकाणी वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. विशेष प्रथम वर्ष व यापुढेही दरवर्षी दिंडीतील वारकऱ्यांसाठी एक वर्षासाठी रू. एक लाखाचा जनता अपघात विमा उतरण्यात येणार असल्याने जास्तीत जास्त वारकऱ्यांनी ह्या दिंडीत सहभागी व्हावे. सोबत आधार कार्डची झेरॉक्स व ओळखपत्रासाठी एक पासपोर्ट फोटो आणावा, असेही आवाहन दिंडी संचालक जगन्नाथ बाविस्कर (ह.मु.देशमुख नगर,चोपडा) यांनी केले आहे.

No comments