adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा

ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा  किरण धायले मुक्ताईनगर (संपादक -:...

ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा 


किरण धायले मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर – अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत व प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३२६ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अंतुर्ली येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी त्रिवार मानाचा मुजरा केला.

कार्यक्रमात निवृत्ती सपकाळ, प्रभाकर सोनार, उखर्ड बोरसे, विवेक कल्याण कुलकर्णी, बंडू पंडित, नितीन पाटील, अनिल वाडीले, अनिल न्हावकर, शांताराम महाजन यांच्यासह वाचनालयाचे वाचक व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा, स्वराज्य स्थापनेच्या कार्याचा आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ऐतिहासिक महत्त्वाचा गौरवपूर्ण आढावा घेण्यात आला. शिवराज्याभिषेकानंतर महाराजांना "क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपती" हा किताब बहाल करण्यात आला होता. तसेच राज्याभिषेकासाठी ३२ मण वजनाचे सुवर्ण सिंहासन तयार करण्यात आल्याची ऐतिहासिक माहिती उपस्थितांना देण्यात आली.

कार्यक्रमानंतर सुनील सपकाळ यांनी उपस्थितांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले.

"जय भवानी, जय शिवाजी" च्या घोषणांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments