adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

देवणी तालुका भाजपाला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा विसर...?

 देवणी तालुका भाजपाला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा विसर...?     लातूर, जि.प्र. (उत्तम माने ) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) लातूर: जनसंघ ते...

 देवणी तालुका भाजपाला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा विसर...? 


   लातूर, जि.प्र. (उत्तम माने )

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

लातूर: जनसंघ ते भारतीय जनता पार्टी यांची पाळेमुळे देवणी शहर ते संपूर्ण महाराष्ट्र व दिल्लीपर्यंत रुजवणारे महाराष्ट्राचे माजी उप ख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे गोपीनाथरावजी मुंडे यांनी देवणी तालुक्याच्या विकासासाठी आपले संपूर्ण जीवन झिजवले जनसंघ ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पार्टी यांचे विचार आणि प्रचार प्रसारासाठी त्यांनी देवणी तालुक्यातील गल्लो गल्लीतील वाटा झिजवल्या व देवणी तालुक्यात काखेत बॅग अडकवून त्यांनी संपूर्ण देवणी तालुक्यात संघाच्या विचारासाठी संपूर्ण तालुका पादाक्रांत केले व विचारांचे पाळे मुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुजवले गेले त्यामुळेच पूर्वीचा हेर मतदार संघ व आताचा निलंगा मतदार संघ या मतदार संघात स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या विचारामुळेच आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद चे अध्यक्ष असे अनेक पद देवणी तालुक्याला लाभले  आजही त्यांच्या विचारावर ठाम असलेल्या कार्यकर्त्या मुळेच पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य आमदार ही पदे सहजासहजी लाभत आहेत त्यांचे विचार व कार्यकाळ देवणी तालुक्याला एक सुवर्णकाळ लाभला आहे आजही त्यांचे कर्तुत्व देवणीसाठी असलेली आपुलकी व त्यांनी उभा केलेली वैचारिक शिदोरी आणि भाजपा विषयी विचार प्रबोधन हे आजही त्यांच्या कर्तुत्वाचा फलित म्हणून देवणीत आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक पदे कार्यकर्ते नेते पुढारी उपभोगत आहेत यांचे श्रेय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना आहे गोपीनाथ मुंडे यांनी गुंडप्पा धनोरे हलगीराव पाटील प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचे देवणीवर अतिशय प्रेम होते जनसंघ राष्ट्रीय स्वयंक संघ व भारतीय जनता पार्टी या पक्षाची मुहूर्तमेढ रोवण्यात देवणी शहरातूनच सुरुवात झाली त्यानंतर भारतीय जनता पक्षांची सत्ता देवणी डोंबिवली आणि दिल्ली येथे राहिली त्यामुळे शहराला जनसंघ भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची जननी म्हटले तरी वावगे ठरू नये देवणीकरांचे ऋण परतफेड करण्यासाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी देवणीच्या विकासासाठी काय पाहिजे हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर ज्येष्ठ नेते हवगीगीराव पाटील यांनी देवणीला तालुक्याचा दर्जा मिळावा ही आमची अपेक्षा आहे असे म्हणतात जेव्हा तालुका निर्मितीची वेळ आली तेव्हा सर्वप्रथम देवणी सह इतर तालुक्याची निर्मिती झाल्याची घोषणा उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांनी केली आणि देवणी शहराला तालुक्याचा दर्जा मिळून दिला म्हणून आज शहरात सर्वच तालुकास्तरीय कार्यालय आहेत ग्रामीण भागातील लोकांच्या सोयीसाठी योग्य ती कामे होत आहेत यांची परतफेड देवणीकर व भारतीय जनता पार्टी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करून सुद्धा परतफेड करत नाहीत आणि भारतीय जनता पार्टीला स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचा विसर पडला आहे काय?असा प्रश्न उपस्थित होतोय निदान त्यांच्या विचारावर स्थापन झालेल्या पदाधिकाऱ्यांना तरी गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पुण्यतिथीचे भान असावं अशी अपेक्षा असताना सुद्धा कोणालाच या स्वर्गीय नेत्याचं सोयरे सुतुक नाही असा प्रश्न सर्वसामान्य लोक उपस्थित करीत आहेत गोपीनाथ मुंडे प्रमोदजी महाजन गुंडप्पा धनोरे आणि हलगीराव पाटील यांनी सर्वसामान्यांसाठी भाजपच्या विचारासाठी भाजपच्या प्रचारासाठी भाजपच्या प्रसारासाठी जेलभोगली त्याचे फळ आज देवणी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते चाकत आहेत मात्र यांचा विसर पडलेला दिसून येतोय अटल बिहारी वाजपेयी प्रमोदजी महाजन आणि गोपीनाथरावजी मुंडे यांच्या विचाराची भाजपा आज महाराष्ट्रात आहे की नाही असा प्रश्नही सर्वसामान्य लोक उपस्थित करीत आहेत जर गोपीनाथ मुंडे अटल बिहारी वाजपेयी प्रमोद जी महाजन यांच्या विचारांची भाजपा लातूर जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात देवणी तालुक्यात असेल तर गोपीनाथ मुंडे सारख्या कर्तव्यदक्ष कार्यसम्राट असलेल्या नेत्याचा विसर भारतीय जनता पार्टीला पडत नाही हे तितकच खरं असलं तरी भारतीय जनता पार्टी हे नेमके कुणाच्या विचाराची आहे आणि त्यांचा कर्ताधर्ता कोण असा प्रश्नही देवणी तालुक्यात उपस्थित केला जात आहे त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीचा विसर पडणे हे कितीपत योग्य आहे भारतीय जनता पक्षातील नेते कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करावे अशी चर्चा देवणी शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणे होत असताना दिसून येते.

No comments