adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भारत विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी सौ. संगीता फिरके यांची नियुक्ती

 भारत विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी सौ. संगीता फिरके यांची नियुक्ती  फैजपूर  इदू पिंजारी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) न्हावी येथील भारत विद्...

 भारत विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी सौ. संगीता फिरके यांची नियुक्ती 


फैजपूर  इदू पिंजारी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

न्हावी येथील भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक विजय विठ्ठल वारके हे नुकतेच सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या मुख्याध्यापक पदावर शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ. संगीता ललितकुमार फिरके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सौ. फिरके यांनी अनेक वर्षे शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट सेवा बजावत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या शैक्षणिक अनुभव, प्रशासकीय कौशल्य आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या समर्पित वृत्तीमुळे संस्थेने त्यांच्यावर मुख्याध्यापकपदाची जबाबदारी सोपविली आहे.

त्यांच्या नियुक्तीमुळे विद्यालयाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व गुणवत्ता विकासाच्या उपक्रमांना अधिक चालना मिळेल, असा विश्वास शिक्षक, पालक व ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे.

सौ. संगीता फिरके यांच्या मुख्याध्यापकपदी झालेल्या नियुक्तीबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या भावी कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

No comments