पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे यांची सावदा येथून अहिल्यानगर येथे प्रशासकीय बदली. रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) स...
पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे यांची सावदा येथून अहिल्यानगर येथे प्रशासकीय बदली.
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सावदा तालुका रावेर येथील पोलीस स्थानकात गत दोन वर्षांपासून कार्यरत शिस्तप्रिय कर्तव्यदक्ष कार्यतत्पर शिस्तबद्ध कर्मनिष्ठ तसेच शिस्तीचे काटेकोरपणे पालन, कणखर असे सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल नारायण गर्जे यांना दोन वर्षांपासून सेवारत कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्याची सावदा पोलीस स्टेशन येथून अहिल्यानगर येथे प्रशासकीय बदली झाली त्यांना आज सावदा पोलीस स्टेशनचे सहकारी वरिष्ठ अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पुंडलिक पाटील यांच्या सह पोलीस कर्मचारी प्रतिनिधी लोकप्रतिनिधी, पत्रकार, तसेच मित्र परिवार यांनी निरोप दिला
पीएसआय अमोल गर्जे यांनी सावदा पोलीस स्टेशनमध्ये सेवाकाळात शिस्तप्रिय शिस्तबद्ध कार्यपध्दती, मनमिळावू स्वभावामुळे जनसामान्यांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण केले प्रशासकीय बाबीत तडजोड केली नाही कायद्याचे काटेकोर तंतोतंत पालन केले कायद्याच्या चौकटीत राहून शिस्तप्रिय कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून चोखपणे ईमान ऐतबारे आपले कार्यकर्तृत्व निभावले त्यांच्या याच निःस्वार्थ निर्मळ कार्यपद्धती ने अनेकांना त्यांचे चाहते केले असो पण प्रशासकीय बदली असल्याने आज त्यांना मोठ्या जड अंतःकरणाने पदभार सोडल्यानंतर निरोप देण्यात आला यावेळी
उपनिरीक्षक अमोल गर्जे यांनी
आजचा संपूर्ण दिवस माझे प्रभारी अधिकारी, स्टाफ, व माझे सावदा व ईतर गावा मधील सर्व जिवलग लोकांनी आयुष्य भरासाठी अविस्मरणीय केला आहे.. जिथेही असेल आपले ऋण व प्रेमाचे हे अनमोल क्षण कधीही विस्मरणात जाऊ देणार नाही.. आजन्म ऋणात राहणार असल्याचे सांगितले

No comments