adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वादळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी अडीच लाख रुपये मदत देण्याची शिवसेना उबाठाची मागणी रावेर तहसीलदार यांना दिले निवेदन

 वादळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी अडीच लाख रुपये मदत देण्याची शिवसेना उबाठाची मागणी  रावेर तहसीलदार यांना दिले निवेदन  मुबारक तडवी ...

 वादळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी अडीच लाख रुपये मदत देण्याची शिवसेना उबाठाची मागणी 

रावेर तहसीलदार यांना दिले निवेदन 


मुबारक तडवी रावेर सह संपादक 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी पावसाचा तडाखा बसुन शेकडो हेक्टरवरील केळी बागांचे, पिकाचे नुकसान झाले आहे, नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून  तातडीची मदत नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी. रावेर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने तडाखा दिला आहे. कापणीला आलेल्या शेकडो हेक्टरवरील केळी बागांचे या पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. केळी बागांच्या नुकसानीचा आकडा कोटींच्या घरात असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत हेक्टरी अडीच लाख देण्यात यावी. शेतकऱ्यांना डिझेल, पेट्रोल कोटा 25/30% राखीव ठेवण्यात यावा. रावेर तालुक्यात अवकाळी वादळी वारा पावसाने हजेरी लावली. अक्षरशः वादळी पावसाने तालुक्याला जोरदार तडाखा दिला आहे. जोरदार वादळी वाऱ्यामुळे कापणीला आलेल्या केळी बागा मोडून पडल्याने मोठ्या प्रमाणावर केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. हातातोंडांशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असून


शेतकऱ्यांसमोर यामुळे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. पावसामुळे वीज पुरवठा खंडीत झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तर्फे रावेर तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आले आहे. कुंभारखेडा, मोठा वाघोदा बुद्रुक चिनावल, उटखेडा, कुसुम्बा, भाटखेडा, विवरा, निंभोरा, दसनूर, गहुखेडा, रणगांव, तासखेडा, या पट्ट्यात तसेच कोचूर, निरूळ, अटवडा, नेहेता, दोधे, वाघोड व अनेक गावातील शेती शिवारातील केळी या पिकाला वादळाचा जबरदस्त फटका बसला आहे. पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी. अन्यथा शिवसेना उबाठा रावेर तर्फे

तीव्र आंदोलन करण्यात येईल. निवेदन प्रति

महामहिम राज्यपाल, मुख्यमंत्री, महाराष्ट्र

राज्य. कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य.

मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे. मुंबई. मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य. जिल्हाधिकारी जळगांव. ई-मेल करण्यात आल्या आहेत. निवेदन नायब तहसीलदार संजय तायडे यांना देतांना पदाधिकारी प्रल्हाद महाजन, योगीराज पाटील जिल्हा प्रमुख, प्रमोद कोंडे तालुका अध्यक्ष, संतोष महाजन प्लम्बर शहर उपप्रमुख, अशोक शिंदे जिल्हा उपसंघटक, राकेश घोरपडे शहर प्रमुख, संतोष महाजन ता. संघटक, स्वप्नील गिरडे युवासेना ता. उपप्रमुख, सुरेश शिंदे शेतकरी आघाडी सेना तालुकाअध्यक्ष, निवृत्ती पाटील, आदी शिवसैनिक शेतकरी उपस्थित होते.

No comments