adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अडावद पोलिसांची पांढरी शिवारात धडक कारवाई गावठी दारू हातभट्टी अड्डा उद्धवस्त

अडावद पोलिसांची पांढरी शिवारात धडक कारवाई गावठी दारू हातभट्टी अड्डा उद्धवस्त प्रतिनिधी अडावद  (संपादक : हेमकांत गायकवाड) अडावद पासून१०की.मी...

अडावद पोलिसांची पांढरी शिवारात धडक कारवाई गावठी दारू हातभट्टी अड्डा उद्धवस्त




प्रतिनिधी अडावद 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

अडावद पासून१०की.मी. अंतरावर पांढरी शिवारात दिनांक २७ जून २०२६ रोजी पांढरी शिवारातील जीवन कोळी यांच्या शेता जवळील नाल्यात सुरू असलेल्या अवैध गावठी हातबट्टी दारूवर छापा टाकण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारवाई दरम्यान समाधान अशोक कोळी वय २९ राहणार अडावद तालुका चोपडा यांच्या ताब्यात १,४०० लीटर.कच्चे रसायन ५० लिटर उकळते रसायन आणि २०ली. तयार हात भट्टीची दारू असा एकूण १,४७० लिटर साठा जप्त करण्यात आला या कारवाई ८९,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध अडावद पोलीस स्टेशन येथे १३९/२०२६ अन्यवे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(फ),(ब),(क)(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शेषराव तोरे,पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण शिरसाठ,सहाय्यक फौजदार सुनील तायडे,भूषण चव्हाण सह पोलिसांच्या पथकाने कारवाई केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण शिरसाठ करीत आहे तसेच या कारवाईमुळे अवैद्य धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई सुरूच राहणार असे पोलिसांनी स्पष्ट केले

No comments