विधान परिषदचे उमेदवार शरद भाऊ तायडे यांची फैजपूर शिवसेना कार्यालयात भेट इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शिवसेना (उद्धव ब...
विधान परिषदचे उमेदवार शरद भाऊ तायडे यांची फैजपूर शिवसेना कार्यालयात भेट
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधान परिषद उमेदवार शरदभाऊ तायडे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ तसेच जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांनी शिवसेना महिला यावल तालुकाप्रमुख ॲड. हेमांगी चौधरी यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
यावेळी पक्ष संघटन, आगामी स्थानिक राजकीय घडामोडी तसेच शिवसेनेच्या विविध उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. भेटीदरम्यान शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख संदीपभाऊ माळी, माजी नगरसेवक अप्पासाहेब चौधरी, उपशहरप्रमुख फिरोज खान, मोहन सोनवणे, कल्पेशभाऊ खात्री, ॲड. आकाश चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेना पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

No comments