यावल ग्रामीण रुग्णालयातील सेवानिवृत्त परिचारिका शेवंताबाई शंकर भालेराव यांचे निधन भरत कोळी यावल ता.प्र. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल ...
यावल ग्रामीण रुग्णालयातील सेवानिवृत्त परिचारिका शेवंताबाई शंकर भालेराव यांचे निधन
भरत कोळी यावल ता.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल शहरातील तिरुपती नगर येथील रहिवासी तथा यावल ग्रामीण रुग्णालयातील सेवानिवृत्त परिचारिका शेवंताबाई शंकर भालेराव (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने यावल शहराने एक सेवाभावी, कर्तव्यदक्ष आणि ममतेचा झरा असलेले व्यक्तिमत्त्व गमावले आहे.
आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी यावल ग्रामीण रुग्णालयात हजारो माता-भगिनींची सेवा केली. त्या काळात प्रसूतीसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध नसतानाही त्यांनी अनेक महिलांची व नवजात बालकांची अत्यंत समर्पित भावनेने काळजी घेतली. रुग्णालयात तसेच गरज पडल्यास घरोघरी जाऊन त्यांनी आरोग्यसेवा दिली. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे त्या अनेक कुटुंबांच्या कायम स्मरणात राहतील.
त्या यावल येथील प्रसिद्ध क्रिकेटपटू विष्णू उर्फ गंपा भालेराव यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, जावई, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या निधनामुळे यावल शहरात हळहळ व्यक्त होत असून सर्व स्तरांतून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत.
ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो व भालेराव परिवारास हे दुःख सहन करण्याचे बळ प्रदान करो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.

No comments