थोरगव्हाण परीसरात पहिल्या पावसात केळी भुईसपाट; महसुल विभागकडून पंचनामे सुरू भरत कोळी यावल (संपादक -:-हेमकांत गायकवाड) मनवेल ता यावल : ...
थोरगव्हाण परीसरात पहिल्या पावसात केळी भुईसपाट; महसुल विभागकडून पंचनामे सुरू
भरत कोळी यावल
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
मनवेल ता यावल : मनवेल थोरगव्हाण परीसरात २४ जून रोजी रात्री झालेल्या पहिल्या पाऊसात वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली यात केळी पिकांचे नुकसान झाले असून केळीचे नुकसान झाले आहे. थोरगव्हाण येथील शेतकरी गजानन गोकुळ चौधरी यांच्या गट नंबर १७२ या मनवेल शिवारातील शेतात दोन हजार केळीचे झाडे लावली होती यात वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले यात केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मनवेल तलाठी यांनी शेतात जाऊन पंचनामे केले आहे. अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे
केळी बागा मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र या पडलेल्या केळीला असलेले घड विक्रीयोग्य तयार नसल्याने ते पूर्ण फेकावे लागणार आहे त्यातच केळीची वजनदार पाने असलेल्या केळीखांबांना फेकण्यासाठी त्या खांबांचे तीन तुकडे करून फेकणे, पाने काढून फेकणे, ठिंबक ठिंबक संच, पाईप काढणे, व नवीन पीक लावणे यासाठी हेक्टरी ६० ते ७५ हजार रुपये खर्च येणार असून आता ही रक्कम कुठून आणायची? हा प्रश्न नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. शिवाय मजुरांचा तुटवडा असल्याने मजूरी ही चढ्या भावाने लागणार आहे. यामुळे केळी उत्पादकांपुढे समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे केळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

No comments