उत्साह पूर्ण वातावरणात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा चोपडा प्रतिनिधी : चंद्रकांत पाटील (संपादक : हेमकांत गायकवाड) चोपडा एज्युकेशन सोसायटी...
उत्साह पूर्ण वातावरणात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा
चोपडा प्रतिनिधी : चंद्रकांत पाटील
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित,प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल,चोपडा या ठिकाणी २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.योग दिनाचे महत्त्व,योगआसनाचे फायदे,योगआसनामुळे आपल्या शरीरावर होणारे परिणाम किती फायदेशीर आहेत या संदर्भातले मार्गदर्शन क्रीडा शिक्षक समाधान माळी यांनी केले.शरीराला आवश्यक असा व्यायाम प्रकार वार्मअप,सूर्यनमस्कार पासून सुरवात नंतर योगासनाची आसने ताडासन,त्रियक ताडासन,वक्रासन,वृक्षासन,अर्धचक्रासन,त्रिकोणासन,वीरभद्रआसन,पादहस्तासन,वज्रासन बालासन,पवन,मुक्तआसन,बद्धकोणासन,भुजंगासन, विरासन,शवासन इत्यादी आसन घेत प्राणायाम मध्ये भस्त्रिका प्राणायाम,कपालभारति प्राणायाम बाह्य प्राणायाम,अनुलोम-विलोम प्राणायाम,भ्रामरी प्राणायाम,उद्गीथ प्राणायाम शेवटी शांती मंत्र घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या योग दिनाच्या कार्यक्रमाला चोपडा एज्युकेशन सोसायटी चे समन्वयक गोविंदभाई गुजराथी उपस्थित होते त्यांनी देखील आसने केली या शुभेच्छा दिल्यात,प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल चे मुख्याध्यापक रजीश बालन उपमुख्याध्यापिका निखिला त्याचबरोबर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतना बडगुजर यांनी केले.
तसेच चोपडा क्लायमेट वारियर अभियानांतर्गत क्लायमेट वारियर शपथ घेऊन विद्यार्थ्यांना वैशाली माळी यांनी पर्यावरण निमित्त प्लास्टिक वापर बंद करावा यासंदर्भातली प्रतिज्ञा योगा दिनाच्या माध्यमातून घेण्यात आली...






No comments