मोठे वाघोदा येथील जि.प शाळा रामभरोसे ... संरक्षण भिंती व प्रवेश गेट तुटलेल्या अवस्थेत.. ...तर मग ग्रामपंचायत ने लाखों रुपयांचा निधी कोणत्या...
मोठे वाघोदा येथील जि.प शाळा रामभरोसे ... संरक्षण भिंती व प्रवेश गेट तुटलेल्या अवस्थेत..
...तर मग ग्रामपंचायत ने लाखों रुपयांचा निधी कोणत्या कामावर खर्च केला? नागरिकांचा सवाल
मुबारक तडवी रावेर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा बुद्रुक येथील जिल्हा परिषद मराठी मुला मुलींची शाळा येथे विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक पायाभूत सुविधांचा अभाव! शाळेत सोयी सुविधा व संरक्षक भिंत नाही त्यामुळे या शाळेचा वापर शेत रस्ता म्हणुन केला जात आहे.शाळेतुनच सार्वजनिक रस्त्यासारखा याचा वापर केला जात आहे.. शाळेच्या संरक्षण भिंती तुटलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत प्रांगणात मोकाट फिरणारे गुरे भुरे वावरतांना दिसतात व साहित्यांचे ही नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे.. विशेष म्हणजे
प्राथमिक शिक्षण (Primary Education) हा कोणत्याही बालकाच्या औपचारिक शिक्षणाचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जातो
जिल्हा परिषद च्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण दिले जाते कारण शिक्षक हे विशेष श्रेणी व पात्रता धारक असतात. व ते बालकांच्या मानसिकतेचा विचार करणारे असतात परंतु शिक्षणासोबत मुलांना भौतिक सुविधा आवश्यक आहे. परंतु मोठा वाघोदा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये भौतिक असुविधांचा सामना विद्यार्थ्यांना व शिक्षकांना करावा लागत आहे. येथीलजिल्हा परिषद मराठी शाळेच्या वर्ग खोल्या ह्या छताला वॉटरप्रूफिंग नसल्यामुळे गळत आहेत. वर्ग खोल्यांच्या छताला गळती लागत असल्याने शालेय शैक्षणिक इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य पाऊस पडल्यानंतर जळून जाते किंवा शॉक लागण्याचा धोका निर्माण होतो त्यामुळे मुलांना वर्गामध्ये पावसाळ्यामध्ये अधिक भिती वाटते शाळेतील फरशा खालून पोकळ झाल्यामुळे दोन वेळा सापांचे व घुशींचे अस्तित्व दिसून आले त्या तळ सोडत आहेत तसेच मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह असणे आवश्यक आहेत परंतु कंपाऊंड नसल्याने सार्वजनिक लोक ते वापरत आहेत त्यामुळे अस्वच्छता भिंत पडलेल्या अशा स्वरूपात आहे. म्हणजे नसल्यासारखे आहेत तसेच पर्यावरण संवर्धनाचे शिक्षण प्राथमिक शाळेत दिलं जातं परंतु पर्यावरण जतन करण्याआधी शाळेला संरक्षक भिंत नाही शाळेला गेट नाही गावातील लोकांचा सरलास वापर शाळेतून आहे शाळा बंद झाल्यावर गावातील मुलं मोटरसायकली चालवतात त्याला हटकणारे पालक नाही शिक्षक गेल्यानंतर वर्ग खोल्यांची नुकसान होत आहे कॅमेऱ्याची तोडफोड केली जात आहे जर संरक्षक भिंत बांधली तर शाळेला पर्यावरण पूरक बनवता येईल. परसबाग करता येईल झाडे लावता येतील ती जगवता येतील मैदान तयार करून मुलांना खेळांची आवड निर्माण करता येईल म्हणून प्रशासनाने व गावातील प्रशासन चालवणारा संस्थाने ग्रामपंचायतीने व सरकारी तसेच लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देऊन उदार मताने मदत करून ही शाळा वाचवली गेली पाहिजे..
मोठा वाघोदा बुद्रुक ग्रामपंचायत प्रशासनाने १५वा वित्त आयोगाच्या निधीतून आरोग्य व शिक्षण साठी जिल्हा परिषद शाळेमध्ये अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी निधी ची तरतूद केली जाते व आहे तर वरील प्रमाणे जिल्हा परिषद शाळेमध्ये असुविधा आहेत तर मग गेल्या चार वर्षांपासून ग्रामपंचायत ने लाखों रुपयांचा निधी कुठे कसा व कोणत्या कामांवर केला आहे हे विचार करण्याची बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे....


No comments