adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

"दहा वर्षांच्या पत्रकारितेच्या प्रवासानंतर अमोल वैद्य यांचे साईमत परिवाराप्रती कृतज्ञतापूर्वक मनोगत"

 "दहा वर्षांच्या पत्रकारितेच्या प्रवासानंतर अमोल वैद्य यांचे साईमत परिवाराप्रती कृतज्ञतापूर्वक मनोगत"  सतिश गायकवाड मुक्ताईनगर (सं...

 "दहा वर्षांच्या पत्रकारितेच्या प्रवासानंतर अमोल वैद्य यांचे साईमत परिवाराप्रती कृतज्ञतापूर्वक मनोगत" 


सतिश गायकवाड मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मुक्ताईनगर :– निर्भीड आणि प्रभावी पत्रकारितेसाठी ओळख असलेल्या दैनिक साईमत वृत्तपत्रासोबत तब्बल दहा वर्षे प्रतिनिधी म्हणून कार्य केलेले अमोल वैद्य यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या कार्याला विराम देत वृत्तपत्राबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

आपल्या मनोगतात त्यांनी म्हटले आहे की, दैनिक साईमत हे केवळ वृत्तपत्र नसून निर्भीड पत्रकारितेचे एक सक्षम व्यासपीठ आहे. या वृत्तपत्रात प्रकाशित होणाऱ्या बातम्यांची दखल अनेकदा प्रशासनालाही घ्यावी लागते, हीच त्याच्या विश्वासार्हतेची आणि प्रभावी पत्रकारितेची खरी ओळख आहे.

गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात साईमत परिवाराने दिलेले मार्गदर्शन, सहकार्य आणि विश्वास याबद्दल त्यांनी विशेष आभार व्यक्त केले. “दैनिक साईमतमुळेच मला समाजात मान, सन्मान, ओळख आणि लोकांचे प्रेम मिळाले. पत्रकारितेची खरी दिशा आणि जबाबदारी समजून घेण्याची संधी या वृत्तपत्राने दिली,” असेही त्यांनी नमूद केले.

वैयक्तिक कारणांमुळे पत्रकारितेतील सक्रिय कामकाज थांबवत असलो तरी दैनिक साईमतबद्दलचे प्रेम, आदर आणि आपुलकी कायम राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच वृत्तपत्राचे संपादक, व्यवस्थापन आणि संपूर्ण साईमत परिवार यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.

दहा वर्षांच्या यशस्वी पत्रकारितेच्या प्रवासानंतर अमोल वैद्य यांनी व्यक्त केलेल्या या कृतज्ञतापूर्ण भावना पत्रकारिता क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

No comments