adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर पोलीस स्टेशनचे नूतन एपीआय संदीप पाटील यांचा न्हावी ता.यावल येथिल पत्रकारांकडून सन्मान

 फैजपूर पोलीस स्टेशनचे नूतन एपीआय संदीप पाटील यांचा न्हावी ता.यावल येथिल पत्रकारांकडून सन्मान  इदू पिंजारी फैजपूर - (संपादक -:- हेमकांत गायक...

 फैजपूर पोलीस स्टेशनचे नूतन एपीआय संदीप पाटील यांचा न्हावी ता.यावल येथिल पत्रकारांकडून सन्मान 


इदू पिंजारी फैजपूर -

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर पोलीस स्टेशन येथे नुकतीच सहाय्यक पोलीस निरीक्षक (ए पी आय) म्हणून नियुक्ती झालेल्या संदीप रमेश पाटील यांचा न्हावी ता.यावल येथील पत्रकार बांधवांच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी पत्रकारांनी पाटील यांना त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा देत, त्यांच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होईल तसेच सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी कामगिरी घडेल, असा विश्वास व्यक्त केला.

संदीप पाटील यांनी यापूर्वीही विविध ठिकाणी कर्तव्य बजावताना प्रामाणिकपणा, शिस्तबद्धता आणि जनसामान्यांशी संवाद साधण्याची सकारात्मक भूमिका जपली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे फैजपूर परिसरातील नागरिकांमध्येही अपेक्षांचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस प्रशासन आणि जनतेमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ होईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

सत्काराला उत्तर देताना ए पी आय संदीप पाटील यांनी पत्रकारांनी दाखविलेल्या सद्भावनेबद्दल आभार मानले. पोलीस प्रशासन आणि प्रसारमाध्यमे ही समाजहिताची दोन महत्त्वाची माध्यमे असून, परस्पर सहकार्याच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, असे त्यांनी सांगितले. या सत्कार प्रसंगी पत्रकार रवींद्र कोलते, पी. के. चौधरी, संतोष बारी, संजय बारी व ललितकुमार फिरके उपस्थित होते. कार्यक्रमात मैत्रीपूर्ण वातावरणात संवाद साधण्यात आला. उपस्थितांनी ए पी आय पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल कार्यकाळासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

No comments