सार्वजनिक विद्यालय अडावद येथून पोलिओ जनजागृती रॅली चोपडा तालुका प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) आज दिनांक 27 जून 2026 रोजी विद्याल...
सार्वजनिक विद्यालय अडावद येथून पोलिओ जनजागृती रॅली
चोपडा तालुका प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
आज दिनांक 27 जून 2026 रोजी विद्यालयाचे मुख्याध्यापक .अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र अडावद यांच्या सहकार्याने विद्यालयातून रॅलीचे आयोजन करण्यात आले. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार प्रायोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमे अंतर्गत 28 जून 2026 रविवार हा दिवस पल्स पोलिओ दिवस म्हणून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये साजरा केला जात आहे. जनजागृती म्हणून विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची पोलिओ जनजागृती रॅलीचे आयोजन विद्यालयातर्फे करण्यात आले. पाच वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओ डोस घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी घोषणा देऊन केले. गावातील चौका चौकात - लस द्या बाळा, पोलिओ टाळा; एकच ध्यास - एकच नारा , पोलिओ मुक्त भारत सारा! अशा घोषणा दिल्या . रॅलीमध्ये विद्यालयातील हर्षद कंखरे, सचिन पाटील, नलिनी पाटील, सपना कोळी, प्रशांत पवार या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष सहभाग घेतला. पर्यवेक्षक . एम. जी. पाटील व सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनी यांनी परिश्रम घेतले.
अडावद ता चोपडा येथील सार्वजनिक विद्यालयातील विद्यार्थी यांनी पल्स पोलिओ निमित्त गावात रॅली काढण्यात आली या प्रसंगी विद्यार्थी व शिक्षक सचीन पाटील हर्ष द कंखरे प्रशांत पवार शिक्षिका नलिनी पाटील सपना कोळी आदी मान्यवर

No comments