कर्तव्यनिष्ठ सेवेला सलाम; चोपडा येथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव चंद्रकांत पाटील विचखेडा संपादक : हेमकांत गायकवाड चोपडा येथील शासकीय वि...
चंद्रकांत पाटील विचखेडा
संपादक : हेमकांत गायकवाड
चोपडा येथील शासकीय विश्रामगृहात राज्य परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेले सुदाम रामदास करणकाळ तसेच बापू त्रिंबक बहारे (ग्रेडेड मुख्याध्यापक, वेले) यांच्या सेवानिवृत्ती निमित्त छोटूभाऊ वारडे व मित्र परिवाराच्या वतीने गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. दिलीप पंडित सपकाळे हे होते. यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी सुदाम करणकाळ व बापू बहारे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास रमेश ज्ञानोबा शिंदे (नगरसेवक), वंदनाबाई सुधाकर बाविस्कर (नगरसेविका), अशोक राजाराम बाविस्कर (माजी नगरसेवक), भरत भीमराव शिरसाठ (अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा, चोपडा), विजय कढरे सर, मोहन फुगारे (माजी कस्टम अधिकारी), सुभाष वारडे सर, संतोष बाविस्कर सर, प्रा. पूर्णानंद वारडे, हिलाल वारडे सर, रवींद्र वाडे, छोटू सोनवणे, भीमराव उमाळे, निर्मल अहिरे, कुलभूषण डोळे, अनिल वाडे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
सत्कार समारंभात मान्यवरांनी सुदाम करणकाळ व बापू बहारे यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवाकार्यातील योगदानाचा गौरव करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. समाजाभिमुख कार्य, प्रामाणिक सेवा व कर्तव्यनिष्ठ वृत्ती यामुळे त्यांनी आपल्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केल्याचे वक्त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुखदेव लक्ष्मण बाविस्कर (आडगाव) यांनी केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. पूर्णानंद वारडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या गौरवासाठी आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

No comments