adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फसव्या कर्जमाफीचा शासन निर्णय जाळुन शेतकऱ्यांनी केला सरकारचा निषेध...!

फसव्या कर्जमाफीचा शासन निर्णय जाळुन शेतकऱ्यांनी केला सरकारचा निषेध...! जळगाव जामोद प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड) जळगाव (जा.):- राज्य...

फसव्या कर्जमाफीचा शासन निर्णय जाळुन शेतकऱ्यांनी केला सरकारचा निषेध...!



जळगाव जामोद प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

जळगाव (जा.):- राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी विरोधात दिनांक ११ जुन रोजी तहसील कार्यलय जळगाव (जा.) येथे शेतकऱ्यांनी एकत्रित येत शासन निर्णय जाळुन प्रचंड आक्रोश करण्यात केला.

राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली असली तरी या योजनेतील अटी व निकषांमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहत आहे.

विद्यमान राज्यकर्त्यांनी निवडणुकीच्या काळात सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते मात्र प्रत्यक्ष शासन निर्णयामध्ये विविध बंधने घालून अनेक शेतकऱ्यांना योजनेच्या बाहेर ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष दिसत आहे.

आंदोलनादरम्यान रविकांत तुपकरांनी सरकारवर टीका करताना सांगितली की शेतकऱ्याच्या अपेक्षांवर पाणी फिरणारा हा शासन निर्णय असून शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याचे सोडून विविध अटी शर्ती घालून कर्जमाफीचा लाभ मर्यादित करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.

त्यामुळे ही योजना कर्जमाफी पेक्षा कर्ज वसुलीची योजना असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे यावेळी शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफी ची मागणी करताना शेतकरी हिताचा निर्णय तातडीने घेण्याचे आवाहन केले.

मागील आठवड्यामध्ये जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड असे नुकसान झाले असून केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी.

तसेच 2025 ला सोयाबीन कापूस व इतर पिकाचे खूप नुकसान झाले होते जिल्ह्यामध्ये हजारो शेतकऱ्यांनी विमा काढला होता मात्र पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याने अनेक शेतकरी पिकविम्या पासून वंचित आहे तरी पिक-विमा कंपनीने सुद्धा शेतकऱ्याच्या भावनेचा अंत पाहू नये अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रविकांत तुपकर यांनी आंदोलनादरम्यान दिला.

या आंदोलनावेळी युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी सरकारच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर या पेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.

यावेळी शिवदास खिरोडकार, अजय गिरी,अनिलसिह राजपुत,वैभव जाणे,आकाश आटोळे,जितुभाऊ चाहेल, फारुख शेख,पप्पू पोटेअमोल बहादरे,ज्ञानेश्वर पिसे,सदा जाणे, ज्ञानेश्वर चोपडे,राजेंद्र राखोडे,विजय रायपुरे,अशोक राखुंडे,प्रमोद तिजारे,छोटू पाटील,अनिल अंबरते,त्रीलोकसिह राजपूत, मोहन चांभारे, गजानन व्यवहारे, फारुक शेख,अजहर शेख, संदीप गवई तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.




No comments