adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण..

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण.. जळगांव प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड) जळगाव, दि. १४ : मह...

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण..


जळगांव प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

जळगाव, दि. १४ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील सर्कलमध्ये आज ५० बोगनवेलींची रोपे लावून पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम राबविण्यात आला. शहरातील प्रमुख आणि वर्दळीच्या चौकांपैकी एक असलेल्या या ठिकाणी सुशोभित व फुलझाडांची लागवड करून परिसर अधिक आकर्षक आणि पर्यावरणपूरक करण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.

राज ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, सत्कार किंवा दिखाऊ कार्यक्रमांऐवजी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचे कार्य करावे, असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले होते. त्यांच्या याच आदेशाचे पालन करत मनसेतर्फे हा वृक्षारोपण उपक्रम हाती घेण्यात आला.

यावेळी लावण्यात आलेल्या बोगनवेलींच्या रोपांची नियमित देखभाल, पाणीपुरवठा आणि संरक्षणाची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वीकारणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच येत्या आठवडाभरात आणखी शंभर बोगनवेलींची लागवड आकाशवाणी सर्कल परिसरात करण्यात येणार असून मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दररोज संध्याकाळी या रोपांना पाणी घालण्याचे काम करणार आहेत.

या उपक्रमात जळगाव शहरात पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या “माझं शहर, माझी जबाबदारी” या संस्थेने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. संस्थेचे सुहास दुसाने, डॉ. लीना पाटील, प्रा. विशाल पाटील, प्राजक्ता चौधरी, विलास बरडे आणि राजेंद्र राणे यांनी वृक्षारोपण मोहिमेत सक्रिय योगदान दिले.

वृक्षारोपण सुरू असतानाच जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर दीपमाला काळे या त्या मार्गाने जात असताना त्यांनी उपक्रमाची दखल घेत थांबून स्वतः एक रोप लावले आणि पर्यावरण संवर्धनाच्या या मोहिमेला शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सहभागामुळे उपस्थित कार्यकर्त्यांचा उत्साह अधिक वाढला.

महानगरपालिका पर्यावरण विभागाचे प्रमुख प्रकाश पाटील यांनीही या उपक्रमाला उपस्थित राहून पर्यावरण संवर्धनासाठी अशा सामाजिक सहभागाची गरज अधोरेखित केली.

या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, डॉ. अनुज पाटील, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, चेतन पवार, प्रकाश जोशी, शहर सचिव जितेंद्र पाटील, राहुल चव्हाण, साजन पाटील, खुशाल ठाकूर, संजय मोती, दीपक राठोड, शुभम भावसार, युसुफ खाटीक, साजन पाटील, विकास पात्रे, सतीश सैंदाणे, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील तसेच महिला शाखाध्यक्ष अनिता कापुरे लक्ष्मी भील व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला असून सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणाप्रती उत्तरदायित्व यांचे सुंदर उदाहरण या निमित्ताने जळगावकरांना पाहायला मिळाले.




No comments