धडगाव तालुक्यातील घाटली ग्रुप ग्रामपंचायतीत कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; उच्चस्तरीय चौकशीची नागरिकांची मागणी! विकासकामे केवळ कागदावरच?...
धडगाव तालुक्यातील घाटली ग्रुप ग्रामपंचायतीत कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; उच्चस्तरीय चौकशीची नागरिकांची मागणी!
विकासकामे केवळ कागदावरच? ग्रामसभा न घेता निधी खर्च केल्याचा आरोप; ग्रामसेवक व सरपंचांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
धडगाव प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
धडगाव तालुक्यातील घाटली ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये विविध विकास योजनांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. अनेक कामे प्रत्यक्षात न करता केवळ कागदोपत्री पूर्ण दाखवून शासनाचा निधी अपहार करण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतीतील अनेक योजना व विकासकामे प्रत्यक्षात दिसून येत नसताना त्यांची बिले काढण्यात आली आहेत. तसेच काही सदस्यांना विश्वासात न घेता आणि नियमित ग्रामसभा न घेता महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, शासनाकडून प्राप्त झालेला निधी विकासकामांवर खर्च न करता काही संबंधितांनी संगनमत करून हडप केल्याची शक्यता असून याबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, पंचायत समिती आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन सर्व कामांचे सामाजिक व आर्थिक लेखापरीक्षण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

No comments