adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

'उपमहापौर इम्पॅक्ट':दिल्लीगेट येथील धोकादायक डिव्हायडरवर अवघ्या काही तासांत बसवले रिफ्लेक्टर!उपमहापौर धनंजय जाधव यांच्या तत्परतेमुळे वाहनधारकांना मोठा दिलासा.

 'उपमहापौर इम्पॅक्ट':दिल्लीगेट येथील धोकादायक डिव्हायडरवर अवघ्या काही तासांत बसवले रिफ्लेक्टर!उपमहापौर धनंजय जाधव यांच्या तत्परतेमुळ...

 'उपमहापौर इम्पॅक्ट':दिल्लीगेट येथील धोकादायक डिव्हायडरवर अवघ्या काही तासांत बसवले रिफ्लेक्टर!उपमहापौर धनंजय जाधव यांच्या तत्परतेमुळे वाहनधारकांना मोठा दिलासा.


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहमदनगर :-दिल्लीगेट परिसरातील रस्त्यावरील डिव्हायडर (दुभाजक) गेल्या काही दिवसांपासून वाहनधारकांसाठी मोठा अपघात प्रवण क्षेत्र बनला होता.रात्रीच्या वेळी किंवा अंधारात हा डिव्हायडर नीट दिसत नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून येथे रोज वाहने धडकून छोटे-मोठे अपघात होत होते.यामुळे नागरिकांमध्ये आणि वाहनधारकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण होते.या समस्येची गंभीर दखल घेत आज उपमहापौर धनंजय जाधव यांनी स्वतःदिल्लीगेट परिसराला भेट देऊन या धोकादायक डिव्हायडरची प्रत्यक्ष पाहणी केली.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपमहापौर जाधव यांनी जागेवरूनच संबंधित महापालिका अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दात सूचना दिल्या व तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले.उपमहापौरांच्या या तडाखेबंद सूचनेनंतर प्रशासन तातडीने कामाला लागले.आदेश मिळाल्यानंतर अवघ्या काही तासांच्या आतच या धोकादायक डिव्हायडरच्या सुरुवातीला एक मजबूत पोल उभारून त्यावर चमकणारे रिफ्लेक्टर (परावर्तक) बसवण्यात आले.

या रिफ्लेक्टरमुळे आता रात्रीच्या वेळी दूरवरून येणाऱ्या वाहनधारकांनाही डिव्हायडर स्पष्टपणे दिसणार असून, यामुळे होणारे अपघात पूर्णपणे टळणार आहेत.उपमहापौर धनंजय जाधव यांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल आणि प्रशासनाकडून करून घेतलेल्या गतिमान कामाबद्दल दिल्लीगेट परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांकडून त्यांचे विशेष आभार मानले जात आहेत.

No comments