adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अल्पवयीन मुलीची विक्री करणारी टोळी पकडली दहा जनांना अटक

अल्पवयीन मुलीची विक्री करणारी टोळी पकडली दहा जनांना अटक प्रतिनिधी जयवंत हागोटे त्रंबकेश्वर (संपादक : हेमकांत गायकवाड) त्रंबकेश्वर तालुक्याती...

अल्पवयीन मुलीची विक्री करणारी टोळी पकडली दहा जनांना अटक



प्रतिनिधी जयवंत हागोटे त्रंबकेश्वर

(संपादक : हेमकांत गायकवाड)

त्रंबकेश्वर तालुक्यातील हरसुल पोलीस ठाणे हद्दीतील आदिवासी गावातील आई नसलेली मुलगी 16 वर्षाची अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाली सदर बाबत तिचे वडील हरसूल पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असता, शेजारच्या परिसरातील कोणताही तरुण बेपत्ता झाल्याचे नसल्याने सदरचे प्रकरण गंभीरपणे घेत वेगवेगळे तपास पथके तयार करून पोलीसांनी शोध सुरू केला तांत्रिक विश्लेषणाचे आधारे अल्पवयीन मुलगी शोधून काढलीच परंतु यात आदिवासी मुलगी विकणारी आंतरजिल्हा टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे यातील आरोपींनी संगणमत करून यातील फिर्यादीची पीडित मुलगी पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचेही देखील माहित असतानाही तिला मोबाईल घेऊन व कपडे घेऊन देवुन तिला लग्नाचे आम्हीच दाखवून तिला तिचे कायदेशीर पालकाचे रखवालेतून पळून घेऊन जावून तिचा संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर गावामध्ये नेऊन बालविवाह लावून दिला आहे पीडित मुलीवर आरोपी याने राहत्या घरी मुलीवर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहे लग्न जुळविण्याकरिता आरोपीने दलालांना दोन लाख रुपये दिल्याचे उघड झाले आहे या प्रकरणात सामील असलेले आरोपी यांना अटक करण्यात आले आहेत तुषार पाटीलबा, संदीप पाटीलबा, सुरेश फसाळे, कमल फसाळे, सीता बेंडकोळी, ठकुबाई माळेकर, धर्मा फसाळे, सोन्याबापू पाटोळे,बाळकृष्ण पाटोळे या आरोपींना अटक करून नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.स्वामी पुढील तपास सुरू आहे.

No comments