adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्वराज्य पोलीस मित्र संघटना रत्नागिरी च्या वतीने मोफत आरोग्य शिबीर

स्वराज्य पोलीस मित्र संघटना रत्नागिरी च्या वतीने मोफत आरोग्य शिबीर कमलेश शेवाळे / प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड) स्वराज्य पोलीस मित्...

स्वराज्य पोलीस मित्र संघटना रत्नागिरी च्या वतीने मोफत आरोग्य शिबीर



कमलेश शेवाळे / प्रतिनिधी 


(संपादक : हेमकांत गायकवाड)


स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे व संस्थापक व मुख्य महासचिव कमलेश शेवाळे तसेच महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा सौ धनश्रीताई उत्पात तसेच संचालक तथा रायगड जिल्हाध्यक्षा सौ दमयंतीताई कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी च्या वतीने आज मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकुण ७० पेशंट तपासण्यासाठी आले होते तसेच त्यांना मोफत चष्मे देखील देण्यात आले. यावेळी टेरवरगाव सरपंच किशोर मनोहर कदम. टेरवगाव मा. उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य रिया राकेश, म्हालीम अनंत डिंगणकर, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था चिपळूण तालुका प्रमुख अनिकेत माणकापुरे, नेत्रतज्ञ डॉ. श्रीकृष्ण जानकर ,जनरल चेकअप संचिता सुर्वे, सिस्टर नेहा जाधव, सिस्टर सिद्धेश सावंत, जिजाऊ गणेश जाधव, ॲम्बुलन्स ड्रायव्हर, पुनम गोरक्षनाथ घुगे, एच ओ प्रीती पांडुरंग गावडे, अशा सेविका, वैभव घागरे आरोग्य सेवक, कीर्ती किरण पालकर, समीक्षा सुहास मोहिते आदी आरोग्य सेवक उपस्थित होते याप्रसंगी रत्नागिरी शहर जिल्हाध्यक्षा सौ दिक्षा माने, चिपळूण तालुका संघटक दक्षता मोरे, चिपळूण तालुका कार्याध्यक्षा रिया म्हालीम आदी पदाधिकारी उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

No comments