adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शेतकरी बांधवांनो धीर सोडू नका, शासन व प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे -आ.चंद्रकांत पाटील

 शेतकरी बांधवांनो धीर सोडू नका, शासन व प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे -आ.चंद्रकांत पाटील   रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- ...

 शेतकरी बांधवांनो धीर सोडू नका, शासन व प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे -आ.चंद्रकांत पाटील  


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दि ४जून रोजी सायंकाळी ६वाजेच्या सुमारास झालेल्या  वादळी पावसामुळे नुकसानग्रस्त केळी पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाला तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले मुक्ताईनगर मतदारसंघातील रावेर तालुक्यातील रेभोटा,निंबोल,खिर्डी,ऐनपूर या गावांमध्ये दि.४ जून रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वारे व अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या केळी पिकांची आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी केली.यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अनेक ठिकाणी केळी बागा पूर्णपणे जमीनदोस्त झालेल्या असून, केळीचे घड व झाडांचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. 



शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी संबंधित प्रांत अधिकारी,कृषी विभागाचे अधिकारी तसेच तलाठी यांना तात्काळ पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार आहे.तसेच वादळी वाऱ्यामुळे अनेक गावांमधील रस्त्यांवर मोठमोठी झाडे पडून नुकसान झाले असून, प्रशासनाला तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शेतकरी बांधवांनी धीर सोडू नये, शासन व प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू.'याप्रसंगी संबंधित गावांतील शेतकरी बांधव, शिवसेना-युवासेना पदाधिकारी,कार्यकर्ते फैजपूर विभागीय अधिकारी प्रांताधिकारी मा.श्री.बबनराव काकडे साहेब, कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.

No comments