adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नुकसानग्रस्त केळी पीकांचे सरसकट १००% नुकसानीचे पंचनामे करण्याचे आ‌. अमोल जावळें ची सुचना नुकसान बघून झाले भावूक!

 नुकसानग्रस्त केळी पीकांचे सरसकट १००% नुकसानीचे पंचनामे करण्याचे आ‌. अमोल जावळें ची सुचना नुकसान बघून झाले भावूक!   मुबारक तडवी रावेर  (संपा...

 नुकसानग्रस्त केळी पीकांचे सरसकट १००% नुकसानीचे पंचनामे करण्याचे आ‌. अमोल जावळें ची सुचना नुकसान बघून झाले भावूक!  


मुबारक तडवी रावेर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर यावल मतदारसंघाचे  आमदार अमोल जावळे यांनी नुकसानग्रस्त परिसराला भेट देऊन केळी क्षेत्रावरील शंभर टक्के नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना  सूचना दिल्या. दि ४जून रोजी सायंकाळी ६वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने 

रावेर तालुक्यात सुमारे २० हजार हेक्टर वरील चिनावल, मोठा वाघोदा बुद्रुक कुंभारखेडा, वडगाव, सावखेडा, विवरा परिसरातील शेती शिवारात लागवड केलेल्या कापणी वर आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या केळी बागा  झालेल्या वादळ गारपीट व वादळी पावसाने जमीनदोस्त झाले आहे यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास या नैसर्गिक आपत्तीने हिरावला गेला आहे गेल्या दोन वर्षापासून राब राब राबवून कर्जाऊ पैसा उचलून उभ्या केलेल्या केळी बागा उत्पादकांच्या डोळ्यादेखत भुईसपाट झाल्याने परिसरात शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळून अश्रू अनावर झाले आहे असल्यामुळे केळीचे सरसकट १०० टक्के नुकसानीचे पंचनामे करा- आ. अमोल जावळे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत 


मोठा वाघोदा बुद्रुक ते रावेर महामार्गावर तसेच खेडेगावातील  रस्त्यांवर अस़ख्य मोठमोठे वृक्ष उन्मळून पडल्याने रात्री उशिरापर्यंत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक विस्कळित झाली होती आडवे पडलेले वृक्ष बाजूला करण्यासाठी व वाहतूक सुरळीत करण्यासाठी सावदा पोलीस स्टेशनचे सपोनी विशाल पाटील यांनी तत्परता दाखवत रात्रीच वाहतूक सुरळीत केली तर अजूनही शेती शिवारातील विजेचे पोल ट्रान्सफॉर्मर व तारा तुटून पडल्याने किमान दोन-तीन दिवस तरी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत  दरम्यान महसूल व कृषी विभागाने तात्काळ केळी चा पेरा असलेल्या क्षेत्रा चा सरसकट १०० टक्के पंचनामा करून मदतीची कारवाई करावी अशा सूचना रावेर यावल चे आमदार अमोल जावळे यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करताना संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे.

दि.५ रोजी सकाळी सहा वाजेपासून आमदार अमोल जावळे यांनी नुकसानग्रस्त चिनावल वडगाव उटखेडा कुंभारखेडा विवरा सावखेडा या गावांच्या शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या केळी भागांमध्ये भेटी दिल्या यावेळी त्यांनी उपस्थित तलाठी कृषी अधिकारी तहसीलदार यांना सत्ता सूचना देऊन शंभर टक्के पंचनामाच्या सूचना दिल्या यावेळी आमदारा अमोल जावळे हे शेतकऱ्यांचे नुकसान पाहताना अक्षरशः भावूक भाऊ झाले नजरेसमोर नुकसान पाहून अक्षरशः भावूक झाले त्या़ंच्या डोळ्यात स्पष्ट अश्रू दिसत होते. केळीच्या नुकसान बघून शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून प्रशासनाने सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. या वेळी आ. अमोल जावळे यांचे सोबत फैजपूर विभागाचे प्रांत अधिकारी बबनराव काकडे, रावेर तहसीलदार आरडी पाटील, तालुका कृषी अधिकारी वारके मंडळ अधिकारी अमोल चौधरी, रावेर तालुका  सर्व तलाठी, कृषी सेवक हे उपस्थित होते.

No comments