adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

केळी पीकविम्यात क्षेत्र कमी दाखवल्याचा प्रकार; दुरुस्तीसाठी कृषी आयुक्तांकडे एस. बी. पाटील यांचे साकडे

  केळी पीकविम्यात क्षेत्र कमी दाखवल्याचा प्रकार; दुरुस्तीसाठी कृषी आयुक्तांकडे एस. बी. पाटील यांचे साकडे  जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकां...

 केळी पीकविम्यात क्षेत्र कमी दाखवल्याचा प्रकार; दुरुस्तीसाठी कृषी आयुक्तांकडे एस. बी. पाटील यांचे साकडे 


जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव, प्रतिनिधी : केळी पीकविमा योजनेअंतर्गत यापूर्वी मंजूर करण्यात आलेले लागवड क्षेत्र विमा कंपनीकडून नव्याने कमी दाखविण्यात आल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. अवकाळी पाऊस व वादळामुळे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रारी दाखल केल्या असता मंजूर क्षेत्रात कपात झाल्याचे निदर्शनास आले आहे. या गंभीर प्रकाराकडे शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस. बी. पाटील यांनी कृषी आयुक्त सूरज मांढरे यांचे लक्ष वेधले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पीकविमा कंपन्यांनी यापूर्वी मंजूर केलेले क्षेत्र शेतकऱ्यांच्या माहितीस न देता कमी केल्याचे अनेक प्रकरणांमध्ये आढळून आले आहे. जिल्ह्यात अशा शेतकऱ्यांची संख्या हजारोंमध्ये असल्याचा दावा करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांचे मूळ मंजूर क्षेत्र कृषी विभागामार्फत तपासून तत्काळ दुरुस्त करण्यात यावे तसेच पीकविमा कंपनी अथवा संबंधित कर्मचाऱ्यांकडून परस्पर क्षेत्रात बदल करण्याच्या प्रकारांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावर कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी सकारात्मक भूमिका घेत योग्य निर्णय घेऊन आवश्यक आदेश देण्यात येतील, असे आश्वासन दिल्याची माहिती एस. बी. पाटील यांनी दिली.

दरम्यान, शेतकऱ्यांनी आपल्या पीकविमा अर्जातील क्षेत्राची पडताळणी करावी. प्रत्यक्ष लागवड क्षेत्र व विमा क्षेत्रामध्ये तफावत आढळल्यास तातडीने तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. एकदा केळी पीक काढून टाकल्यानंतर तक्रारींची पडताळणी करणे अवघड होऊ शकते, त्यामुळे वेळेत दाद मागणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे.

No comments