adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हातेड खु!! च्या महेश हिरालाल पावनकर यांची भारतीय सैन्याच्या अग्निवीर भरतीत निवड; गावाचा मान उंचावला

 हातेड खु!! च्या महेश हिरालाल पावनकर यांची भारतीय सैन्याच्या अग्निवीर भरतीत निवड; गावाचा मान उंचावला  शामसुंदर सोनवणे वि.प्र. (संपादक -:- हे...

 हातेड खु!! च्या महेश हिरालाल पावनकर यांची भारतीय सैन्याच्या अग्निवीर भरतीत निवड; गावाचा मान उंचावला 


शामसुंदर सोनवणे वि.प्र.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

हातेड खुर्द गावासाठी अभिमानाची बाब ठरली असून गावातील महेश हिरालाल पावनकर यांची भारतीय सैन्याच्या अग्निवीर भरती प्रक्रियेत यशस्वी निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महेश हे कै. भालेराव सखाराम पावनकर यांचे नातू, कै. प्रवीण सखाराम पावनकर यांचे नातू, श्री. रवींद्र सखाराम पावनकर यांचे नातू तसेच श्री. हिरालाल सखाराम पावनकर यांचे सुपुत्र आहेत. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि देशसेवेची प्रबळ जिद्द यांच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केले आहे.

निवडीची बातमी समजताच गावात महेश यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. ग्रामस्थ, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

महेश यांच्या या यशामुळे परिसरातील अनेक युवकांना भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी प्रेरणा मिळाली असून त्यांच्या या यशाने हातेड खुर्द गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

यावेळी समस्त पावनकर परिवार तसेच गावकऱ्यांच्या वतीने महेश हिरालाल पावनकर यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या हातून देशसेवा घडो आणि भारतीय सैन्यात उज्ज्वल कारकीर्द घडो, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.

No comments