adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महिलेच्या घरासमोर आक्षेपार्ह वस्तू टाकून विनयभंग; तिघांविरुद्ध कारवाई, अल्पवयीन मुलाचाही समावेश

नेप्ती शिवारात थरारक फिल्मी स्टाईल पाठलाग..राज्य उत्पादन शुल्काची धडक कारवाई ओम्नी कारमधून हातभट्टीची वाहतूक करणाऱ्या ठोकल्या बेड्या  सचिन म...

नेप्ती शिवारात थरारक फिल्मी स्टाईल पाठलाग..राज्य उत्पादन शुल्काची धडक कारवाई ओम्नी कारमधून हातभट्टीची वाहतूक करणाऱ्या ठोकल्या बेड्या 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

​अहिल्यानगर:- नगर-कल्याण रोडवरील नेप्ती शिवार परिसरात राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने एका संशयित ओम्नी कारचा थरारक पाठलाग करून मोठी कारवाई केली आहे.या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयांच्या मुद्देमालासह बेकायदेशीर गावठी दारूचा साठा जप्त केला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.या फिल्मी स्टाईल कारवाईमुळे अवैध दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.​राज्य उत्पादन शुल्क विभागाला नगर-कल्याण रोडवरून एका ओम्नी कारमधून मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.त्यानुसार भरारी पथक क्र.१ च्या टीमने नगर-कल्याण रोडवरील हॉटेल अमरज्योत समोर,नेप्ती शिवार येथे सापळा रचला.​एक संशयास्पद मारुती सुझुकी ओम्नी कार (क्र. MH 12 AX 6001) येताना दिसताच अधिकाऱ्यांनी तिला थांबवण्याचा इशारा केला. मात्र,चालकाने गाडीचा वेग वाढवून पळून जाण्याचा प्रयत्न केला.यानंतर भरारी पथकाने अत्यंत चाणाक्षपणे आणि धाडसाने या वाहनाचा थरारक पाठलाग केला आणि अखेर गाडीला घेरून थांबवण्यात यश मिळवले.​अतिशय गोपनीय पद्धतीने आणि विक्रीच्या उद्देशाने या वाहनात गावठी दारू लपवून ठेवली होती.
​३५ लीटर क्षमतेचे ६ प्लास्टिक कॅन (एकूण २१० लीटर गावठी दारू),​गुन्ह्यात वापरलेली मारुती सुझुकी ओम्नी कार या 
​जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत ३,२२,८००/- रुपये आहे.
​या प्रकरणी आरोपी संदीप ज्ञानेश्वर होले (वय ३९ वर्षे, रा. नेप्ती,ता.जि.अहिल्यानगर) याला ताब्यात घेण्यात आले असून,याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.​ही धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री.प्रमोद सु.सोनोने (अहिल्यानगर-१), अधीक्षक,श्री.ऋषिकेश इंगळे (अहिल्यानगर-२),आणि उपअधीक्षक श्री.प्रविणकुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.सुरज कुसळे (निरीक्षक),श्री.आनंद जावळे (दुय्यम निरीक्षक),श्रीम.श्रुष्टी भागवत (दुय्यम निरीक्षक),
​कर्मचारी (जवान):सुरज पवार, सुनील निमसे,चतुर पाटोळे, सिद्धांत गिरीगोसावी आणि महिला जवान सुनंदा अकोलकर,​नगर तालुका पोलीस स्टेशनचे हवालदार श्री. एस.बी.जायभाय व श्री. राहुल कोतकर यांनी केली आहे.​या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्री.आनंद जावळे करत आहेत.

​अवैध ढाबे आणि दारू विक्रेत्यांनो सावधान!
​"अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्रीचे ठिकाण तसेच अवैध ढाब्यांवर यापुढेही अशीच सातत्याने आणि कठोर कारवाई केली जाणार आहे. बेकायदेशीर कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत."
श्री.सुरज कुसळे (निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. १, अहिल्यानगर)
​जनतेला प्रशासनाचे आवाहन!
​अहिल्यानगर जिल्ह्यात कुठेही अवैध मद्य निर्मिती, वाहतूक किंवा विक्री सुरू असल्यास नागरिकांनी तात्काळ प्रशासनाला माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल.
​टोल फ्री क्रमांक: 18002339999
​व्हॉट्सॲप (WhatsApp) क्रमांक: 8422001133

No comments