adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूरात नवीन पाईपलाईन जोडणीसाठी नागरिकांकडून २,५०० रुपये वसुलीचा आरोप; चौकशीची मागणी

फैजपूरात नवीन पाईपलाईन जोडणीसाठी नागरिकांकडून २,५०० रुपये वसुलीचा आरोप; चौकशीची मागणी इदू पिंजारी फैजपूर  (संपादक : हेमकांत गायकवाड) फैजपूर,...

फैजपूरात नवीन पाईपलाईन जोडणीसाठी नागरिकांकडून २,५०० रुपये वसुलीचा आरोप; चौकशीची मागणी


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

फैजपूर, शहरातील वार्ड क्रमांक १ (अ) तहानगर परिसरातील नागरिकांनी नवीन पाणीपुरवठा पाईपलाईन जोडणीसाठी प्रति नळ कनेक्शनधारकाकडून २,५०० रुपये वसूल करण्यात येत असल्याचा आरोप करीत नगरपालिका प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली आहे.

परिसरात पूर्वी २ इंची पाईपलाईन होती. वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन नगरपालिकेमार्फत ४ इंची नवीन पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र, नवीन पाईपलाईनवर जुनी नळ कनेक्शने जोडण्यासाठी नागरिकांकडून प्रत्येकी २,५०० रुपये आकारले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, ते जुने नळ कनेक्शनधारक असून पाईपलाईन बदलण्याचे काम हे नगरपालिकेचे आहे. त्यामुळे या कामाचा आर्थिक भार सर्वसामान्य नागरिकांवर टाकणे अन्यायकारक आहे. काही नागरिकांनी दबावाखाली संबंधित रक्कम भरल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मुस्तकीम खान सलीम खान मणियार यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करून प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच जुनी कनेक्शने कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता नवीन पाईपलाईनला जोडण्यात यावीत आणि ज्या नागरिकांकडून रक्कम वसूल करण्यात आली आहे त्यांना ती परत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, मागण्यांवर योग्य कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन व उपोषण करण्याचा इशाराही तक्रारदार व नागरिकांनी लेखी स्वरुपात दिला आहे.

No comments