अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात २ वर्षांपासून फरार असलेला आरोपी अखेर जेरबंद! कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई अहिल्यानगर (प्रतिनिधी): ...
अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात २ वर्षांपासून फरार असलेला आरोपी अखेर जेरबंद! कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी): सचिन मोकळ
(संपादक : हेमकांत गायकवाड)
गेल्या दोन वर्षांपासून स्वतःचे अस्तित्व लपवून आणि पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून फरार असलेल्या एका सराईत आरोपीला जेरबंद करण्यात कोटवाली पोलिसांना अखेर यश आले आहे. सुरेश उत्तम वैराळ (वय ३८ वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या फरार आरोपीचे नाव असून, त्याला राहुरी येथून अत्यंत शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे.या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कामगिरीचे मोठे कौतुक होत आहे.मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार,२१ फेब्रुवारी २०२४ रोजी फिर्यादी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका अज्ञात इसमाने कायदेशीर रखवालीतून पळवून नेले होते.या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गु.र.नं २५८/२०२४ नुसार भा.दं.वि. कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अपहृत मुलीचा कसून शोध घेतला. मुलीचा शोध लागल्यानंतर तिच्या जबाबावरून या प्रकरणात धक्कादायक खुलासे झाले.त्यानुसार या गुन्ह्यात भा.दं.वि. कलम ३७६(२)(एन), १०९, २१२ सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (POCSO Act) २०१२ चे कलम ३, ४, ५(ज), (२), ५(ल),१६,१७ ही गंभीर aकलमे वाढवण्यात आली.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी क्र.१ राहुल संतोष जाधव याच्याविरुद्ध कोतवाली पोलिसांनी २० जून २०२४ रोजीच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. मात्र,गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी क्र.२ सुरेश उत्तम वैराळ (वय ३८) हा स्वतःचे अस्तित्व लपवून पोलिसांना सतत गुंगारा देत फरार होता.
पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपी शोध मोहिमे अंतर्गत कोतवाली पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.दरम्यान,आरोपी सुरेश वैराळ याच्याबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली.या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून राहुरी येथून आरोपीला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला त्याचा लपंडाव अखेर खाकीच्या कडक कारवाईने संपवला.सदरची धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक श्री.मुमक्का सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.संभाजी गायकवाड,पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस अंमलदार राहुल शिंदे, रोहिणी दरंदले,सुरज कदम, रमेश शिंदे तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस अंमलदार राहुल गुंडू यांच्या पथकाने केली आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे हे करत आहे.

No comments