adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहीम; ३० जून रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रियेत राजकीय पक्षांचा सहभाग वाढविण्यासाठी तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांचे आवाहन

चोपडा विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहीम; ३० जून रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रियेत राजकीय पक्ष...

चोपडा विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहीम; ३० जून रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन

मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रियेत राजकीय पक्षांचा सहभाग वाढविण्यासाठी तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांचे आवाहन 


चोपडा  प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाच्या अनुषंगाने चोपडा विधानसभा मतदारसंघातील सर्व मान्यताप्राप्त व नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार, दि. ३० जून २०२६ रोजी दुपारी १.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.

यासंदर्भातील अधिकृत पत्र सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, चोपडा यांनी दि. २९ जून २०२६ रोजी जारी केले आहे. सदर बैठक नवीन प्रशासकीय इमारत, तहसीलदार कार्यालय, चोपडा येथे पार पडणार असून बैठकीचे अध्यक्षस्थान उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), जळगाव भूषविणार आहेत.

या बैठकीस भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, शिवसेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन मुक्ती पार्टी तसेच भारत राष्ट्र समिती या प्रमुख राजकीय पक्षांच्या तालुकाध्यक्ष अथवा प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे.

बैठकीत विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेची कार्यपद्धती, मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया, पात्र मतदारांची नोंदणी, मृत अथवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, तसेच मतदार यादी अधिक पारदर्शक व अचूक करण्यासाठी आवश्यक सूचना व मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रात नमूद करण्यात आली आहे.

सर्व संबंधित राजकीय पक्षांच्या अध्यक्षांनी किंवा अधिकृत प्रतिनिधींनी वेळेत उपस्थित राहून निवडणूक प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी केले आहे.

विशेष:

लोकशाही प्रक्रियेत मतदार यादीची अचूकता अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाच्या या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेकडे सर्व राजकीय पक्षांसह नागरिकांचेही लक्ष लागले आहे. बैठकीत होणाऱ्या चर्चेनंतर आगामी मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेच्या अंमलबजावणीला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments