adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

देवळाली प्रवऱ्यात गावठी दारू भट्ट्यांवर ‘एलसीबी’चा मोठा छापा; ६५ हजारांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल!

 देवळाली प्रवऱ्यात गावठी दारू भट्ट्यांवर ‘एलसीबी’चा मोठा छापा; ६५ हजारांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल!  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपा...

 देवळाली प्रवऱ्यात गावठी दारू भट्ट्यांवर ‘एलसीबी’चा मोठा छापा; ६५ हजारांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल! 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:-  जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले आहेत.या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात धडक कारवाई करत गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर छापे टाकले.या कारवाईत पोलिसांनी ६५ हजार ८६५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून,५ आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथक ३१ मे २०२६ रोजी राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते. दरम्यान, देवळाली प्रवरा गावच्या शिवारातील फत्तेराज मंदिराजवळ गणेश गायकवाड नावाचा इसम बेकायदेशीरपणे कच्चे रसायन वापरून उग्र वासाची गावठी हातभट्टी दारू तयार करत असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली.मिळालेल्या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने देवळाली प्रवरा परिसरातील गावठी हातभट्टी दारू तयार करण्याच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर अचानक छापे टाकले.या छाप्यात पोलिसांनी पुढील ५ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गावठी हातभट्टीची तयार दारू, कच्चे रसायन आणि नवसागर असा एकूण ६५,८६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला:

१) गणेश रमेश गायकवाड (वय २७, रा. फत्तेराज महाराज मंदिराजवळ, देवळाली प्रवरा)

२) रविंद्र दिगंबर डुकरे (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी)

३) राजेंद्र धोंडीराम उंडे (वय ५४, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी)

४) बापु भास्कर गायकवाड (रा. वडारवाडा, देवळाली प्रवरा)

५) रामचंद्र विठ्ठल काळे (वय ६२, रा. राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी) असे पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

नवीन कायद्यानुसार गुन्हा दाखल

पकडण्यात आलेल्या सर्व आरोपींविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६३९/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १२३, २७५ सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई)(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि किरणकुमार कबाडी, पोउपनि संदीप मुरकुटे,पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, विशाल तनपुरे आणि भगवान थोरात यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे राहुरी तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

No comments