सेवाभावातून वाढदिवसाचे अनोखे सेलिब्रेशन; अनाथ व मतिमंद बालकांसोबत साजरा केला विकास सेन यांचा वाढदिवस शिरपूर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत ग...
सेवाभावातून वाढदिवसाचे अनोखे सेलिब्रेशन; अनाथ व मतिमंद बालकांसोबत साजरा केला विकास सेन यांचा वाढदिवस
शिरपूर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शिरपूर : जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. विकास भाऊ सेन यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २ जून रोजी सामाजिक बांधिलकी जपत अनाथ व मतिमंद बालकांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला. या सेवाभावी उपक्रमामुळे बालगृहातील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून उपस्थितांनी या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले.
शिरपूर तालुक्यातील मांडळ शिवार येथील अनाथ मतिमंद मुलांचे बालगृहात आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते निराधार व मतिमंद बालगोपाळांना अल्पोपहार (नाश्ता) वाटप करण्यात आले. निष्पाप बालकांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि समाधान हेच या वाढदिवसाचे खरे यश ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
समाजसेवेची अखंड ज्योत आपल्या कार्यातून प्रज्वलित ठेवणारे मा. विकास भाऊ सेन हे स्वतःचा वाढदिवस साजरा करत नसल्याने त्यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावातून हा उपक्रम राबवून त्यांच्या सामाजिक कार्याला मानवंदना देण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे जिल्हाध्यक्ष नानासो गोकूळ येशी, धुळे जिल्हा महामंडळाचे सचिव आर. एन. पवार, राज्य कार्यकारिणी सदस्य रामचंद्र पवार, गोपाल वरसाळे, जितेंद्र सनेर, लौकीचे माजी सरपंच भिमसिंग राजपूत, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मनोहर पाटील, दादू पाटील तसेच जगदीश धनगर आदी मान्यवर उपस्थित होते.
याच कार्यक्रमात राज्य कार्यकारिणी सदस्य रामचंद्र पवार यांचा वाढदिवस देखील उपस्थितांच्या शुभेच्छांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनात कायम स्मरणात राहील, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
— रामचंद्र भाऊ येशी

No comments