adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यिका सौ. शोभा चौधरी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यिका सौ. शोभा चौधरी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार  अडावद  प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायक...

अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यिका सौ. शोभा चौधरी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार 


अडावद  प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, अडावद येथे आरोग्य सहाय्यिका म्हणून प्रदीर्घ काळ सेवा बजावल्यानंतर सौ. शोभा साहेबराव चौधरी या सेवानिवृत्त झाल्या. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आरोग्य विभागाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चोपडा तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सौ. चौधरी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. गोसावी यांनी सौ. चौधरी यांनी सेवाकाळात आरोग्य विभागात बजावलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करत त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास तालुका हिवताप पर्यवेक्षक जगदीश बाविस्कर, तालुका आरोग्य सहाय्यक विजय देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन सुशिर, डॉ. अर्चना पाटील, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पायल गोसावी, औषध निर्माण अधिकारी विजया गावित, आरोग्य सहाय्यक यशवंत पाटील व राहुल नेहरकर, आरोग्य सेवक सुभाष पिंपळसेंडे, कैलास बडगुजर, रमेश पवार, कनिष्ठ सहाय्यक संजय बोरसे, जीएनएम शेख शेजल, परिचर धुडकू वारडे, गट प्रवर्तक संध्या बोरसे, शालिनी सोनवणे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सौ. शोभा चौधरी यांच्या प्रदीर्घ सेवाकाळातील योगदानाचा गौरव करून त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमात त्यांच्या सेवाभावी कार्याची तसेच आरोग्य विभागासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेण्यात आली.

No comments