फैजपुरच्या तहानगर तडवीवार्ड १ मध्ये विविध नागरिक समस्या नगराध्यक्षा दामिनी सराफ यांना निवेदन सादर आरोग्य सभापती हकीम तडवी यांची मागणी ...
फैजपुरच्या तहानगर तडवीवार्ड १ मध्ये विविध नागरिक समस्या नगराध्यक्षा दामिनी सराफ यांना निवेदन सादर
आरोग्य सभापती हकीम तडवी यांची मागणी
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील वार्ड क्रमांक एक मध्ये विविध नागरी समस्या निर्माण झालेले असून ताहनगर आणि तङवीवार्ड एकमध्ये पावसामुळे जागेजागे डबके साचलेले असून तसेच आरोग्य विषयी प्रश्न समोर आला आहे तरी नपा प्रशासना तात्काळ होणारी गैरसोयी दुर करावी अशी मागणी आरोग्य सभापती हकीम तडवी यांनी आज 30 जून रोजी नगराध्यक्ष दामिनी सराफ यांची भेट घेऊन समस्याचे निवेदन सादर केले त्यात म्हटले आहे की फैजपूर नगरपरिषद हद्दीतील क्रमांक एक मध्ये पिण्याची पाण्याची नवीन पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे मात्र पावसामुळे चिखल झालेले आहे तहानगर उमर हॉस्पिटल पासून मज्जिद खालील पर्यंत व बिलाल मज्जिद मागील बाजूस तिन्ही बाजू गल्ली मध्ये पाईपलाईन टाकण्यात आलेली असून त्या ठिकाणी पाण्यामुळे चिखल झालेले आहेत त्या ठिकाणी मुरूम टाकण्यात यावे तसेच प्रभाग क्रमांक एक व दोन तङवी मज्जित ते नुरूम इस्लाम मज्जिद पर्यंत सांडपाण्याचा गटारीचा गाड काढून साफसफाई करण्यात यावे कारण शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरत आहेत त्यामुळे घाणीच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण झालेला आहे असे निवेदन वार्ड क्रमांक एकचे आरोग्य सभापती हकीम तडवी यांनी मागणी केली आहे

No comments