भटक्या विमुक्त बहुजन संघामार्फत शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम. अरुण धनगर वरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भटक्या विमुक्त बहुजन संघाचे...
भटक्या विमुक्त बहुजन संघामार्फत शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम.
अरुण धनगर वरणगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भटक्या विमुक्त बहुजन संघाचे राज्य अध्यक्षअँड.शिरीषकुमार जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भटक्या विमुक्त बहुजन संघातर्फे दिनांक:- 21 जून 2026 रोजी, वेळ 10 वाजता, स्थळ कमळापूर, वाळूज एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी गरीब शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदरील कार्यक्रमाचे संयोजक अरुण गायकवाड अध्यक्ष कैकाडी समाज आघाडी, ज्येष्ठ समाजसेवक रवींद्र गायकवाड, विदर्भ नेते रामदास जाधव, पत्रकार अरुण धनगर, युवा नेते नाशिक दीपक जाधव तसेच समस्त भटक्या विमुक्त बहुजन संघ सर्व कार्यकर्ते यांनी आयोजन केलेले आहे.

No comments