adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

घाडवेल ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर; ७ सदस्य पदांसाठी आरक्षण सोडत संपन्न

  घाडवेल ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर; ७ सदस्य पदांसाठी आरक्षण सोडत संपन्न  वार्ताहर घाडवेल - अशोक कोळी (संपादक : हेमकांत गायकवाड)  ग्रामपंच...

 घाडवेल ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर; ७ सदस्य पदांसाठी आरक्षण सोडत संपन्न


 वार्ताहर घाडवेल - अशोक कोळी

(संपादक : हेमकांत गायकवाड)

 ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत नुकतीच पार पडली. या सोडतीत ग्रामपंचायतीच्या एकूण ७ सदस्य पदांसाठी विविध प्रवर्गानुसार आरक्षण निश्चित करण्यात आले.

आरक्षणानुसार प्रभाग क्रमांक १ मध्ये २ जागा असून त्यापैकी १ जागा सर्वसाधारण (महिला) तर १ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहे.

प्रभाग क्रमांक २ मध्ये ३ जागा असून त्यामध्ये १ जागा अनुसूचित जमाती (महिला), १ जागा अनुसूचित जमाती आणि १ जागा नामनिर्देशित (महिला) प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहे.

प्रभाग क्रमांक ३ मध्ये २ जागा असून त्यापैकी १ जागा सर्वसाधारण (महिला) तर १ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव करण्यात आली आहे.

एकूण आरक्षणाचा विचार करता अनुसूचित जाती - ०, अनुसूचित जमाती - २, नामनिर्देशित (महिला) - १ आणि सर्वसाधारण - ४ अशा ७ जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

ही आरक्षण सोडत प्रभारी अधिकारी नरेंद्र जाधव, ग्रामसेवक एम. एम. पाटील, तलाठी एम. पी. सूर्यवंशी, पोलीस पाटील भागवत दगडू पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी बी. डी. पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली.

यावेळी अशोक छन्नु कोळी, देवेंद्र खेमराज पाटील, विजय मोहन पाटील, मंगल ज्ञानेश्वर पाटील, अशोक गोपीचंद पाटील, विकास उत्तम कोळी, रविंद्र गोरख पावरा, लिलाधर निंबा पाटील, दीपक इंगळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments