यावलच्या स्वच्छता प्रश्नावर दिशा एजन्सीविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल शहरा...
यावलच्या स्वच्छता प्रश्नावर दिशा एजन्सीविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनल्याने नागरिक व व्यापारी वर्गामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शहरातील स्वच्छतेचा मक्ता असलेल्या दिशा एजन्सी, पुणे यांच्या कामकाजातील निष्काळजीपणा व मनमानी कारभाराबाबत नगरपालिकेकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.
नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी व्यापारी वर्गाकडून प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला. तसेच घनकचरा प्रकल्पाला भेट दिली असता आवश्यक यंत्रसामग्री अद्ययावत नसल्याचे तसेच काही यंत्रसामग्री चोरीस गेल्याचे व परिसरात मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्तता आढळून आल्याचे निदर्शनास आले.
या पार्श्वभूमीवर दिशा एजन्सीला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर संबंधित एजन्सीचा करार रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते वर्षा आकाश चोपडे, तालुकाध्यक्ष आकाश चोपडे, उपजिल्हाध्यक्ष जुगल पाटील, कार्याध्यक्ष कादिर खान, भाजप गटनेते राजेंद्र महाजन, सविता नन्नवरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावल शहराच्या स्वच्छतेशी निगडित हा अत्यंत महत्त्वाचा व जनहिताचा विषय असून नागरिकांनी संबंधित एजन्सीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

No comments