शहरातील माळीवाड्यात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हातात धारदार कोयता घेऊन फिरणाऱ्या तरुणास कोतवाली पोलिसांनी तात्काळ ठोकल्या बेड्या सच...
शहरातील माळीवाड्यात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हातात धारदार कोयता घेऊन फिरणाऱ्या तरुणास कोतवाली पोलिसांनी तात्काळ ठोकल्या बेड्या
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:- शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहिल्यानगरचे कोतवाली पोलीस अत्यंत सतर्क झाले आहेत.दि.०६/०६/२०२६ रोजी रात्रीच्या सुमारास माळीवाडा वेस,कपिलेश्वर पान शॉप शेजारी एक तरुण हातात धारदार लोखंडी कोयता घेऊन संशयास्पदरीत्या फिरत असताना कोतवाली पोलिसांनी त्याला रंगेहात अटक केली आहे. कोतवाली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक हद्दीमध्ये पेट्रोलींग करत असताना,पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गुप्त माहिती मिळाली की,माळीवाडा भागात एक इसम हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत आहे.त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे पोसई प्रविण पाटील व अंमलदार यांना कारवाईचे आदेश दिले.
माहिती मिळताच पथकाने कपिलेश्वर पान शॉपजवळ सापळा रचून संशयित इसमाला ताब्यात घेतले.त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, त्याच्या पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये एक धारदार लोखंडी कोयता मिळून आला.पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपीने आपले नाव रोहन संतोष सातपुते (वय १९ वर्षे,रा.पवार चाळ, बुरुडगाव रोड,ता.जि. अहिल्यानगर) असल्याचे सांगितले.पोलिसांनी त्याच्याकडील कोयता जप्त केला असून,पोकॉ/सचिन लोळगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड,पोसई प्रविण पाटील,तसेच गुन्हे शोध पथकातील अंमलदार बाळकृष्ण दौंड,राहुल शिंदे,विनोद बोरगे, साबीर शेख,विशाल दळवी, दत्तात्रय कोतकर,शिरीष तरटे, अतुल काजळे,अमोल गाडे, दिपक रोहकले,सुरज कदम, सत्यम शिंदे,रमेश शिंदे,अतुल लाटे,सचिन लोळगे,संकेत थिवर, पल्लवी रोहकले आणि राहुल गुंड (दक्षिण मोबाईल सेल) यांच्या पथकाने केली आहे.

No comments