मजीद खान यांची वरिष्ठ लिपीक पदावर पदोन्नती; सर्वत्र अभिनंदन भरत कोळी यावल : (संपादक -:- हेमकांत गायकवाड) नॅशनल एज्युकेशन सोसायटी, यावल अंत...
मजीद खान यांची वरिष्ठ लिपीक पदावर पदोन्नती; सर्वत्र अभिनंदन
भरत कोळी यावल :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नॅशनल एज्युकेशन सोसायटी, यावल अंतर्गत संचालित डॉ. जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, यावल येथील कनिष्ठ लिपीक श्री. मजीद खान हमीद खान हे सन 2008 पासून सेवेत कार्यरत असून त्यांची पदोन्नती होऊन आज दि. 5 जून 2026 रोजी इंदिरा गांधी उर्दू गर्ल्स हायस्कूल, यावल येथे वरिष्ठ लिपीक पदावर नियुक्ती करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापक श्री. इफ्तेखार अहमद यांनी त्यांना नव्या पदावर हजर करून घेतले. प्रसंगी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नासिर खान, वरिष्ठ शिक्षक अरशद खान सर, कनिष्ठ लिपीक कामिल शेख तसेच इलियास पटेल सर उपस्थित होते.
श्री. मजीद खान यांच्या पदोन्नतीबद्दल संस्थेचे अध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, सचिव हाजी जफरुल्ला खान अमानुल्ला खान तसेच डॉ. जाकीर हुसेन उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक तुफेल अहमद यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

No comments