adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

न्हावी भारत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता फिरके यांचा पत्रकारांकडून सत्कार

 न्हावी भारत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता फिरके यांचा पत्रकारांकडून सत्कार   इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) न्हावी ...

 न्हावी भारत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता फिरके यांचा पत्रकारांकडून सत्कार 


 इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

न्हावी येथील भारत विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाच्या नवनिर्वाचित मुख्याध्यापिका सौ. संगीता ललितकुमार फिरके यांचा गावातील पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांच्या मुख्याध्यापिका पदावरील निवडीबद्दल आनंद व्यक्त करत पत्रकारांनी त्यांना पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी पत्रकार ललित फिरके यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सौ. फिरके यांचा सत्कार केला. कार्यक्रम प्रसंगी पत्रकार रवींद्र कोलते, संतोष बारी, संजय बारी तसेच पी. के. चौधरी उपस्थित होते. उपस्थित पत्रकारांनी विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मुख्याध्यापिका म्हणून त्यांच्या कार्यकाळात चांगले उपक्रम राबविले जातील, असा विश्वास व्यक्त केला.

सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापिका सौ. संगीता फिरके यांनी पत्रकारांचे आभार मानले. शिक्षण क्षेत्रातील जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि समाजातील सर्व घटकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रम आनंदी वातावरणात पार पडला. उपस्थितांनी सौ. फिरके यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

No comments