अण्णांच्या माहिती अधिकारावर रणगाडा - आंबेडकर रघुनाथ आंबेडकर-राज्य कार्याध्यक्ष जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्य. पारनेर प...
अण्णांच्या माहिती अधिकारावर रणगाडा - आंबेडकर
![]() |
| रघुनाथ आंबेडकर-राज्य कार्याध्यक्ष जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्य. |
पारनेर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भारत - देशात लोकशाही जिवंत रहावी म्हणून थोर समाजसेवक मा.आण्णासाहेब ( किसन ) हजारे यांनी रक्ताचे पाणी करून २००५ साली माहितीचा अधिकार जन्मास घातला मात्र आज अण्णांना जुना रणगाडा भेट देवून अण्णांच्या माहीती अधिकारावर रणगाडा फिरणार आहे काय ? असा सवाल जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी केला आहे
लोकशाही आज फक्त नावाला दिसत आहे भ्रष्टाचाराने सर्वत्र थैमान घातले असून उपवन संरक्षक अहिल्यानगर कार्यालयात तर भ्रष्ट्राचाराचे कुरण पोसले आहे सदर कार्यालयाने माहिती अधिकाराला " केराची टोपली दाखवली आहे " निरढावलेले भ्रष्ट वनपरीक्षेत अधिकारी , भ्रष्ट उपवन संरक्षक , भ्रष्ट वनरक्षक , भ्रष्ट वनपाल खुलेआम शासनाच्या तिजोरीवर दरोडे घालून माया जमा करत जनतेच्या तिजोरीची राजरोस पणे लुट होत आहे हे तर फक्त एका विभागात आहे असे अनेक विभाग आहेत तेथे काही चोर अधिकारीच मालक झाले आहेत आता " अच्छे दीन " फक्त म्हणायलाच आहेत काय ? म्हणून थोर समाजसेवक मा. अण्णासाहेब (कीसन) हजारे यांनी पुन्हा श्रीकृष्णाची भूमिका घेऊन त्यांचा २००५ चा माहिती अधिकार पुन्हा सक्षम करावा अन्यथा भेट म्हणुन दिलेला तो बंद पडलेला रणगाडा परत करावा असे जनतेच्यावतीने श्री . आंबेडकर यांनी आवाहन केले आहे

No comments