निर्वाण फाउंडेशन व अंतुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने पाडा केअर आरोग्य तपासणी शिबिर संपन्न किरण धायले मुक्ताईनगर (संपा...
निर्वाण फाउंडेशन व अंतुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने पाडा केअर आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
किरण धायले मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
निर्वाण फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि अंतुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC Anturli) यांच्या सहकार्याने PADA CARE INITIATIVE अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये नागरिकांची रक्त तपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले
"शिबिरात सहभागी झालेल्यांमध्ये अंतुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. सैलेश पाटील व त्यांची PHC टीम तसेच पवन बोदडे, बावसकर, अनीता पेंढोर, वंदना साळुंखे, रंजना पाटील, आनंदी मेढे, सुनीता सवाकरे आणि दीपक दुटे यांचा समावेश होता."शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्य सेवा दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम समाजासाठी अत्यंत उपयुक्त ठरला. उपस्थित नागरिकांनी निर्वाण फाउंडेशन आणि अंतुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने भविष्यातही अशा लोकहितकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती.
आयोजक ॲड.प्रफुल्ल किशोर मेढे (संस्थापक व अध्यक्ष) यांनी दिली.आशिष मेढे, अक्षय मेढे, आर्यन मेढे, उदय मेढे आणि अभय शिरतुरे यांचे विशेष सहकार्य लाभले.

No comments