adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अंजनसोंडे गावच्या सुपुत्राची कारागृह पोलीस पदी निवड; गावात भव्य मिरवणुकीत जल्लोष

 अंजनसोंडे गावच्या सुपुत्राची कारागृह पोलीस पदी निवड; गावात भव्य मिरवणुकीत जल्लोष  भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जिद्द, चिकाटी ...

 अंजनसोंडे गावच्या सुपुत्राची कारागृह पोलीस पदी निवड; गावात भव्य मिरवणुकीत जल्लोष 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर गरिबीवर मात करत अंजनसोंडे गावचे सुपुत्र चि. विकास सिंधुबाई मुरलीधर कोळी यांची नाशिक कारागृह पोलीस पदी निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी अंजनसोंडे ग्रामस्थांच्या वतीने गावात उत्साहपूर्ण वातावरणात सत्कार समारंभ व भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.

परिस्थितीवर मात करत यश संपादन

विकास कोळी यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. मात्र, प्रतिकूल परिस्थितीसमोर न झुकता त्यांनी आपले ध्येय निश्चित ठेवून अथक मेहनत घेतली. ते रॉयल फिटनेस अकॅडमी, मुक्ताईनगर येथे शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत स्वतःही स्पर्धा परीक्षांसाठी परिश्रम घेत होते. त्यांच्या या यशामुळे अंजनसोंडे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील तरुणांसाठी त्यांनी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

भव्य मिरवणुकीत आनंदोत्सव

विकास कोळी यांच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी अंजनसोंडे येथील धाडसी वाल्मिक ग्रुप यांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाजत-गाजत, फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत भव्य मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण गाव आनंदाच्या वातावरणात रंगून गेले होते. मिरवणुकीनंतर आयोजित मुख्य सोहळ्यात ग्रामस्थांच्या वतीने विकास कोळी, त्यांची मातोश्री सिंधुबाई कोळी व वडील मुरलीधर कोळी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. "आईच्या कष्टाचे आणि मुलाच्या जिद्दीचे फळ मिळाले," अशा भावना उपस्थितांनी यावेळी व्यक्त केल्या. या आनंदोत्सवात धाडसी वाल्मिक ग्रुपचे सदस्य, मित्र परिवार, गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments