पोदार इंटरनॅशनल स्कूल, अकलूद येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) (अकलूद ) :- पोदार इंटरन...
पोदार इंटरनॅशनल स्कूल, अकलूद येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
(अकलूद ) :- पोदार इंटरनॅशनल स्कूल, भुसावळ येथे आंतरराष्ट्रीय योग दिन
शाळेचे आदरणीय प्राचार्य सचिन बनसोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दैनंदिन प्रार्थना व प्रतिज्ञेने झाली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून कु. राधा आंबेकर (बॅचलर ऑफ योगिक सायन्सेस, युनिव्हर्सिटी ऑफ पतंजली, हरिद्वार) तसेच श्री. यश आंबेकर (मास्टर इन योगिक सायन्स, डिप्लोमा इन गाईडन्स अँड कौन्सिलिंग, को फाउंडर - स्वास्थ्य योग ) उपस्थित होते.
पाहुण्यांचा सत्कार पुष्प गुच्छ देऊन करण्यात आला. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगून विविध योगासने व प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
उभे राहून करण्यात येणाऱ्या ताडासन, वृक्षासन, अर्धचक्रासन, पदहस्तासन, उत्कटासन आणि त्रिकोणासन यांचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बसून करण्यात येणारी शशांकासन आणि गोमुखासन ही आसने विद्यार्थ्यांनी उत्साहाने केली. यानंतर भ्रामरी प्राणायाम शिकवून त्याचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी होणारे फायदे समजावून सांगण्यात आले.
इयत्ता १ ली ते १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी योगासने व प्राणायामाचा सराव करून योगाचे महत्त्व जाणून घेतले. विद्यार्थ्यांनी दररोज योग करण्याची व स्वतःला शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्याची प्रतिज्ञा घेतली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे इयत्ता ६ वी व ७ वीच्या विद्यार्थ्यांनी साकारलेली ताडासन आणि पद्मासन यांची भव्य मानवी आकृती होय. या आकर्षक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
योगामुळे निरोगी जीवनशैली, मानसिक शांतता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते, हा संदेश या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे व्यवस्थापक रामदास कुळकर्णी, उपप्राचार्य रेखा मुळे व शिक्षक वृद्ध यांनी अथक परिश्रम घेतले.


No comments