adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत वारसास २ लाख रुपयांचा धनादेश; महाराष्ट्र ग्रामीण बँक यावलचा पुढाकार

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत वारसास २ लाख रुपयांचा धनादेश; महाराष्ट्र ग्रामीण बँक यावलचा पुढाकार  भरत कोळी यावल ता.प्र. (संपाद...

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत वारसास २ लाख रुपयांचा धनादेश; महाराष्ट्र ग्रामीण बँक यावलचा पुढाकार 


भरत कोळी यावल ता.प्र.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल : महाराष्ट्र ग्रामीण बँक, यावल शाखेतर्फे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत मयत खातेदाराच्या वारसास दोन लाख रुपयांचा विमा धनादेश प्रदान करण्यात आला.

भुसावळ येथील अरुण नारायण न्हावी यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खाते उघडताना बँकेच्या विविध सुविधा, एटीएम, नेट बँकिंग, विमा योजना तसेच अटल पेन्शन योजनेची माहिती घेत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेतला होता. काही दिवसांनंतर त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाले.

यानंतर त्यांच्या पत्नी तथा वारसदार सुरेखा अरुण न्हावी यांनी आवश्यक कागदपत्रे महाराष्ट्र ग्रामीण बँक, यावल शाखेत सादर केली. बँकेच्या पाठपुराव्यानंतर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांचा विमा दावा मंजूर झाला.

या विमा रकमेचा दोन लाख रुपयांचा धनादेश महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक गणेश कुलकर्णी आणि शाखा व्यवस्थापक सचिन सूर्यभान काकडे यांच्या हस्ते सुरेखा अरुण न्हावी तसेच त्यांच्या नातलग रजनी बानाईत यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी सहाय्यक व्यवस्थापक वैशाली नगराळे, जानवी खोडे, रोखपाल चेतनसिंह राजपूत, मेसेंजर महेश दत्तात्रय खाचणे आणि निखिल बारी उपस्थित होते.

याप्रसंगी क्षेत्रीय व्यवस्थापक गणेश कुलकर्णी यांनी उपस्थित खातेदारांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची माहिती देताना सांगितले की, अल्प वार्षिक प्रीमियममध्ये उपलब्ध असलेल्या या योजना कुटुंबासाठी मोठा आर्थिक आधार ठरतात. घरातील कर्त्या व्यक्तीच्या निधनानंतर कुटुंबाला दोन लाख रुपयांची मदत मिळत असल्याने प्रत्येक पात्र खातेदाराने या योजनांचा लाभ घ्यावा.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्मचारी नियमितपणे खातेदारांना विमा योजनांसह विविध बँकिंग सुविधांची माहिती देत असून गावोगावी जाऊन जनजागृतीचे काम करीत आहेत. तसेच कार लोन, हाऊसिंग लोन, गोल्ड लोनसह विविध कर्ज सुविधा बँकेमार्फत उपलब्ध असून नागरिकांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक, यावल शाखेला भेट देऊन या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले.

No comments