adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सांगवी बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी उलथापालथ! आरक्षणाने बदलली सत्तेची संपूर्ण समीकरणे; गावातील राजकारण तापले

  सांगवी बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी उलथापालथ! आरक्षणाने बदलली सत्तेची संपूर्ण समीकरणे; गावातील राजकारण तापले तालुका प्रतिनिधी : राहु...

 सांगवी बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी उलथापालथ!

आरक्षणाने बदलली सत्तेची संपूर्ण समीकरणे; गावातील राजकारण तापले



तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर

(संपादक : हेमकांत गायकवाड)

सांगवी बुद्रुक येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज 12 जून 2026 रोजी पार पडलेल्या वार्डनिहाय आरक्षण सोडतीने संपूर्ण गावातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे. अनेक वर्षांपासून सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या इच्छुकांचे राजकीय गणित एका क्षणात कोलमडले असून गावातील राजकारण अचानक तापले आहे.


ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या या प्रक्रियेकडे गावातील नागरिक, इच्छुक उमेदवार आणि विविध राजकीय गटांचे विशेष लक्ष लागले होते. ही आरक्षण सोडत निवडणूक पर्यवेक्षक गजेंद्र शेलकर, ग्राम महसूल अधिकारी राजू गोरटे आणि ग्रामसेवक पुरुषोत्तम तळेले यांच्या उपस्थितीत पार पडली. महिला आरक्षणाची चिठ्ठी धवल हेमंत अत्तरदे या बालकाच्या हस्ते काढण्यात आली. प्रक्रिया पारदर्शक झाली असली तरी जाहीर झालेल्या आरक्षणानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसून आली.


वार्डनिहाय आरक्षण असे:


वॉर्ड 1 – अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, सर्वसाधारण.वॉर्ड 2 – अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण.वॉर्ड 3 – अनुसूचित जाती सर्वसाधारण, अनुसूचित जमाती सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला.वॉर्ड 4 – सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण.वॉर्ड 5 – अनुसूचित जमाती महिला, सर्वसाधारण.


सर्वात मोठा राजकीय धक्का म्हणजे लोकनियुक्त सरपंच पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित होणे. या निर्णयामुळे गावातील पारंपरिक राजकारणाला मोठा फटका बसला असून अनेक पुरुष इच्छुकांचे संपूर्ण नियोजन अक्षरशः कोलमडले आहे. अनेक वर्षे सरपंच पदावर दावा सांगणाऱ्या काही दिग्गजांच्या अपेक्षांवर या आरक्षणाने पाणी फिरल्याची चर्चा गावभर रंगू लागली आहे.


सरपंच पदासाठी महिला नेतृत्वाची नवी शर्यत


आता सरपंच पदासाठी महिला नेतृत्वाची नवी लढाई सुरू झाली असून तनुजा योगेश भंगाळे, कीर्ती सचिन चौधरी, नीलिमा विकास धांडे, शबनम फिरोज तडवी, सुलोचना भालचंद्र भंगाळे, कोकिळा चंद्रकांत मेघे, लता अतुल फिरके, छाया भूषण धांडे आणि प्रेरणा युवराज भंगाळे या नावांची गावभर जोरदार चर्चा रंगू लागली आहे. विविध गटांमध्ये बैठका सुरू झाल्या असून प्रत्येकजण आपापली रणनीती आखताना दिसत आहे.


मात्र यंदाची निवडणूक केवळ उमेदवारांच्या नावांवर ठरणार नाही, असे चित्र स्पष्ट दिसत आहे. गावातील जातीय-सामाजिक समतोल, विविध समाजघटकांमधील संबंध, आर्थिक ताकद, स्थानिक प्रभाव, राजकीय हितसंबंध आणि कुटुंबीय नेटवर्क हे घटक निर्णायक ठरणार आहेत.


युवक ठरणार ‘गेम चेंजर’


विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत गावातील युवक वर्ग निर्णायक भूमिका बजावणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. गावामधील मोठा युवक वर्ग नेमका कोणत्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहतो, कोणाला संघटनात्मक मदत करतो आणि कोणाला जनसमर्थन मिळवून देतो यावर अनेकांचे राजकीय भविष्य अवलंबून राहणार आहे. चहाच्या टपऱ्यांपासून सोशल मीडियापर्यंत निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे.


सदस्य पदांच्या आरक्षणामुळे अनेक जुन्या राजकीय समीकरणांना तडा गेला असून अनेक इच्छुकांचे डाव कोसळले आहेत. त्यामुळे आता अनेकांचे लक्ष थेट सरपंच पदाच्या निवडणुकीवर केंद्रित झाले आहे. काही नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून गावात राजकीय हालचालींना वेग आला आहे.


सध्या संपूर्ण गावात एकच प्रश्न चर्चेत आहे.


“सांगवी बुद्रुकची सत्ता यावेळी कोणाच्या हातात जाणार? महिला नेतृत्वात कोण बाजी मारणार? आणि युवक वर्ग अखेर कोणाचा गेम बदलणार?”


एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे सांगवी बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजल्या नंतर गावातील राजकारण कमालीचे तापनार असून पुढील काही दिवस प्रत्येक गल्ली, चौक, शेत, बाजारपेठ आणि सोशल मीडियावर फक्त निवडणूक आणि सत्तेचीच चर्चा रंगणार आहे. आता सांगवी बुद्रुकमध्ये खरी राजकीय लढाई सुरू झाली आहे.

No comments