adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पिक विमा खरीप 2025 नुकसान भरपाई व पिक कर्ज प्रोत्साहन अनुदान 2 लाख रुपये सरकारने द्यावे. शेतकरी संघटना पारोळा च्या वतीने तहसीलदारांना निवेदन

 पिक विमा खरीप 2025 नुकसान भरपाई व पिक कर्ज प्रोत्साहन अनुदान 2 लाख रुपये सरकारने द्यावे.         शेतकरी संघटना पारोळा च्या वतीने तहसीलदारां...

 पिक विमा खरीप 2025 नुकसान भरपाई व पिक कर्ज प्रोत्साहन अनुदान 2 लाख रुपये सरकारने द्यावे. 

       शेतकरी संघटना पारोळा च्या वतीने तहसीलदारांना निवेदन   


विकास पाटील धरणगाव 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पारोळा : खरीप पिक विमा 20 25 यावर्षी पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कापूस या प्रमुख पिकासह मका ज्वारी बाजरी उडीद मूग इत्यादी पिकांचा पिक विमा भरला होता मागील वर्षी ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले होते कापूस पिकाचे उत्पादन गेल्या वर्षी एकरी 2 ते 3 क्विंटल उत्पन्न झाले व इतर पिकांचे ही उत्पन्न भयंकर प्रमाणात घटले. कापूस सह कडधान्य व इतर पिकांचे पिक विमा नुकसान भरपाई मिळालीच नाही. 

येत्या पंधरा दिवसात कापूस पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास. शेतकरी संघटना सह तालुक्यातील शेतकरी वर्ग कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचे नमूद केलेले आहे 

   अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेत. महाराष्ट्र राज्यातील नियमित कर्ज भरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान 2 लाख रुपये देण्यात यावेत यावर्षी एल निनो चा फटका शेतकऱ्यांना बसणार असून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. असे शेतकरी संघटना पारोळा कडून नमूद केलेले आहे 

      यावेळी. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष. किशोर पाटील. शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष. प्रा. भिकनराव पाटील. संघटक गुलाब पाटील. अधिकार पाटील. दीपक कुंभार नंदलाल पाटील. वसंत चौधरी. दीपक कुंभार यांनी तहसीलदार. उल्हास देवरे यांना निवेदन दिले.

No comments