adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गिरडगाव येथे विद्यार्थ्यांचे बस रोको आंदोलन; बस थांबा सुरू करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

 गिरडगाव येथे विद्यार्थ्यांचे बस रोको आंदोलन; बस थांबा सुरू करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे    भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड...

 गिरडगाव येथे विद्यार्थ्यांचे बस रोको आंदोलन; बस थांबा सुरू करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे  


 भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 गिरडगाव.ता.यावल येथील  विद्यार्थ्यांसाठी राज्य परिवहन (एसटी) बस थांबत नसल्याने गिरडगाव येथील विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत बस रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे सुमारे एक तास रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.

गिरडगाव येथून अनेक विद्यार्थी यावल, साकळी, किनगाव, चोपडा तसेच जळगाव येथे उच्च शिक्षणासाठी दररोज प्रवास करतात. मात्र, विद्यार्थ्यांना घेण्यासाठी एसटी बस गावात थांबत नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वारंवार तक्रारी करूनही प्रश्न सुटत नसल्याने अखेर विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून बस रोको आंदोलनाचा मार्ग अवलंबला. आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. घटनास्थळी संबंधित अधिकारी व प्रशासनाने विद्यार्थ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे एसटी बस थांबविण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सुमारे एक तासानंतर आंदोलन मागे घेत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, दिलेल्या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याची अपेक्षा विद्यार्थी व पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

No comments